लोकसत्ता प्रतिनिधी

पालघर: पालघर जिल्ह्यत मंगळवारी दिवसभरात १३४५ नागरिकांनी करोना प्रतिबंधक  लस घेतली आहे.  त्यापैकी ११०८ नागरिकांनी  लसीचा पहिला व उर्वरित २३७ जणांनी लसीचा दुसरी डोस घेतला आहे. यापैकी पालघर ग्रामीण भागात ४५८ नागरिकांनी पहिला डोस तर ११५ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.

पालघरमधील १२ शासकीय केंद्रांपैकी नऊ केंद्रांवर लसीकरण सुरू झाले असून चार खाजगी रुग्णालयात देखील लसीकरणाला आजपासून सुरुवात झाली. पालघर ग्रामीण भागात २१६ आरोग्य कर्मचारी तसेच १११ शासकीय कर्मचाऱ्यांनी  करोना लस घेतली.

४५ ते ५९ वयोगतील ६१ तर ग्रामीण भागातील १८५ ज्येष्ठ नागरिकांनी नागरिकांनी करोना लसीचा आज लाभ घेतला आहे. विशेष म्हणजे लस घेतलेल्या नागरिकांपैकी कोणालाही दुष्परिणाम झाला नसल्याचे शासकीय अहवालात म्हटले आहे.