देशामध्ये करोनाची तिसरी लाट येण्याच्या शक्यता व्यक्त करण्यात आलेली असताना महाराष्ट्रातही करोनाबाधितांची संख्या वाढू लागलीय. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात तिसरी लाट आली की काय अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. याचसंदर्भात राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री व अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मोठं विधान केलं आहे. महाराष्ट्रामध्ये करोनाची तिसरी लाट आली नाहीय ना, अशी शंका आता यंत्रणांनाच येऊ लागल्याचं ठाकूर म्हणाल्या आहेत. ग्रामीण भागातील करोनाबाधितांची वाढती संख्या पाहून त्यांनी यासंदर्भातील वक्तव्य केलं आहे. जाणून घेऊयात ठाकूर नक्की काय म्हणाल्यात.

लोकसत्ताचे आणखीन व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.