News Flash

यवतमाळ : करोना रूग्णांच्या संख्येत वाढ; दिवसभरात ५४ रुग्णांची भर

तंदुरूस्त झाल्याने ३७ रूग्णांना डिस्चार्ज

संग्रहित छायाचित्र

यवतमाळ

जिल्ह्यात करोना संसर्ग वाढत असून आज (गुरुवारी) नव्याने ५४ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडल्याने आतापर्यंतच्या रूग्णांची संख्या ९५३ वर पोहचली. दुसरीकडे यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयातील विलगीकरण कक्षासह जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटरमध्ये भरती असलेल्या ३७ रूग्णांना उपचारानंतर बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली.

आज करोनाबाधित आढळलेल्या ५४ जणांमध्ये ४० पुरुष व १४ महिला आहेत. यात नेर शहरातील वैष्णवी नगर येथील दोन पुरुष व एक महिला, नेर शहरातील शिवाजी नगर येथील तीन पुरुष, तोलीपुरा येथील एक पुरुष, वणी शहरातील तेलीफैल येथील सहा पुरुष व चार महिला, आर्णी शहरातील मोमीनपुरा येथील एक पुरुष, यवतमाळ शहरातील लोहारा येथील एक पुरुष, महावीर नगर येथील एक पुरुष, वारको सिटी येथील एक पुरुष व एक महिला, कळंब तालुक्यातील देवनाळा येथील एक पुरुष, जोडमोहा येथील एक पुरुष व एक महिला, वटबोरी येथील एक पुरुष, पांढरकवडा शहरातील महादेव नगर येथील दोन पुरुष, दारव्हा शहरातील तेलीपुरा येथील एक पुरुष, दारव्हा तालुक्यातील नायगाव येथील एक पुरुष, पुसद शहरातील जाम बाजार येथील तीन पुरुष व दोन महिला, पुसद शहरातील मोमीनपुरा येथील एक पुरुष व खातीब वॉर्ड येथील १३ पुरुष व पाच महिलांचा समावेश आहे.

यवतमाळमध्ये सक्रिय करोनाबाधितांची संख्या ३९८ वर पोहचली होती. मात्र ३७ जणांना रुग्णालयातून सुट्टी झाल्याने सद्यस्थितीत ही संख्या ३६१ इतकी झाली आहे. जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या ९५३ इतकी झाली आहे. यापैकी ५६५ जण बरे झाल्यामुळे ते स्वगृही परतले. तर आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १२ हजार ६७० संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2020 7:35 pm

Web Title: coronavirus yavatmal 54 covid positive cases found 37 recovered discharged vjb 91
Next Stories
1 Coronavirus: उमरगा आणि उस्मानाबाद शहरात दुचाकींना प्रतिबंध
2 यवतमाळ : ‘त्या’ करोनाबाधित रूग्णाने जनावरांच्या काळजीने केले होते पलायन
3 करोनाग्रस्त आरोपीने रुग्णालयातूनच ठोकली धुम; जिल्हा व पोलीस प्रशासनाची उडाली झोप
Just Now!
X