News Flash

Coronavirus : करोना झाल्याच्या भीतीने नाशिकमध्ये तरुणाची आत्महत्या

आत्महत्या करण्याअगोदर लिहून ठेवली चिठ्ठी

संग्रहित छायाचित्र

नाशिकरोड येथील चेहेडी पंपिंग स्टेशन येथील एका युवकाने करोना झाल्याच्या भीतीपोटी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू आहे.

या तरुणाचे नाव प्रतीक कुमावत (वय-31) असल्याचे समोर आले असून त्याने आत्महत्या करण्याअगोदर एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली होती. या चिठ्ठीत त्याने आपल्याला करोना झाला असल्याची  भीती व्यक्त करत आपण आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असल्याचे लिहून ठेवले होते. मागील काही दिवसांपासून त्याच्या घशात खवखव होऊ लागल्याने त्याला करोनाचा संशय आला होता. मात्र, या तरूणामध्ये करोनाचे कोणतेही लक्षण आढळले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आणखी वाचा- अकोल्यात करोनाबाधिताची आत्महत्या

महाराष्ट्रातील करोनाबाधितांची संख्या 1 हजार 666 वर पोहचली आहे. रुग्णांची दिवसेंदिवस वाढती संख्या देशासाठी चिंतेची बाब ठरत आहे. पंतप्रधानासंह देशभरातील प्रशासन करोनाला नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2020 3:29 pm

Web Title: coronavirus young man commits suicide in nashik due to fear of corona msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 माणुसकी: बीड समाज कल्याण उपायुक्तांनी केलं ६४ मनोरुग्णांचं केसकर्तन
2 टाळेबंदी संपली तरीही लगेच उठणार नाहीत निर्बंध, सरकारी सूत्रांची माहिती
3 मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून दोन जणांचा मृत्यू
Just Now!
X