17 January 2021

News Flash

ऊसतोड कामगारांना लवकरच घरी पोहोचवणार; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष थोरात यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

काँग्रेसला स्वभाव बदलावा लागेल

संग्रहीत

राज्यात उद्भवलेल्या करोनाच्या परिस्थितीवर सरकारच्या आणि काँग्रेसच्या वतीनं कॅबिनेट मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यात करोनाचा प्रसार आणि प्रभाव कमी करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना संदर्भात माहिती दिली. त्याचबरोबर ‘ऊसतोड कामगारांना घरी पोहोचवण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. ऊसतोड कामगारांना लवकरच घरी पोहोचवण्यात येईल,’ अशी माहितीही त्यांनी दिली.

बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘ज्यावेळी लॉकडाउन सुरू झाला. तेव्हा कारखाने सुरू होते. लॉकडाउन सुरू झाल्यानंतर कारखाने बंद झाले आणि कामगार मोकळे झाले. अशा कामगारांकडे सरकारनं लक्ष देण्यास सुरूवात केली. सलग सहा महिने हे कामगार बाहेर असतात. काम नसल्यामुळे ते घरी जाण्यासाठी तत्पर आहेत. पण, या कामगारांबरोबर बैल जोड्याही असतात. त्यामुळे माणसांच्या बरोबर पशुधनाचाही प्रश्न आहे. राज्य आणि केंद्र अशा दोन स्तरावर लॉकडाउन आहे. त्यात राज्य सरकारनं गावापर्यंत पोहोचवण्यासंदर्भात चर्चा केली आहे. २० नंतर लॉकडाउन काही प्रमाणात शिथिल होण्याचे संकेत केंद्रानं दिले आहेत. त्यामुळे यासंदर्भात राज्याचे सचिव केंद्रीय गृहसचिवांशी चर्चा करणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी याविषयी चर्चा केली. त्यांनी कोणतीही टीका होणार नाही. कामगारांची गैरसोय होणार नाही, अशा पद्धतीनं हा निर्णय घेऊ, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. लवकरच कामगारांना घरी पाठवण्यात येईल,’ अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली.

आणखी वाचा- टाळेबंदीच्या काळात शालेय शुल्क भरण्याची सक्ती करू नये : वर्षा गायकवाड

‘चीनमध्ये करोनाचा उद्रेक झाल्यानंतर राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं. त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही अधिवेशन लवकर संपवण्यात आलं. १० मार्चपासून लोकांचा संपर्क तोडण्याचं काम सुरू केलं होतं. त्यानंतर लॉकडाउन लागू करण्यात आला. महाराष्ट्रात हा संसर्ग वाढण्याचा एक धोका असण्यामागे एक कारण होतं, आंतरराष्ट्रीय विमानतळ. त्यानंतर दुसरा टप्पाही लॉकडाउनचा सुरू झाला आहे. आता नवीन रुग्ण वाढणार नाही. त्याचबरोबर असलेल्या रुग्णांवर उपचार, त्यासाठी लागणार साहित्य याविषयी काम सुरूच आहे. लॉकडाउनच्या काळात नागरी सुविधा पुरवण्याचं काम करण्यात येतं आहे,’ असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

आणखी वाचा- Coronavirus : अर्थव्यवस्थेला फटका बसल्याने ठाकरे सरकारची खर्चाला मोठी कात्री

काँग्रेसचा स्वभाव बदलावा लागेल

यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख कुठे आहेत? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर अमित देशमुखांना करोना सदृश्य लक्षणं दिसून आली होती. सुदैवानं रिपोर्ट निगेटिव्ह आला. आता ते त्यांच्या पातळीवरून काम करत आहेत. मात्र, त्यांनी संवाद साधण्याची गरज असेल, तर तशी त्यांना सांगतो. काँग्रेस प्रत्येक स्तरावर काम करत आहे. पण, काम करत राहायचं प्रसाराकडं ध्यान द्यायचं नाही, असा पक्षाचा स्वभाव आहे. त्यामुळे आम्हाला हा स्वभाव बदलावा लागेल,’असं थोरात यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2020 4:15 pm

Web Title: coronaviruslockdown maharashtra government will reach sugarcane labour to their home bmh 90
टॅग Coronavirus
Next Stories
1 Coronavirus : रायगड जिल्ह्यात करोनाचे पाच नवे रुग्ण
2 टाळेबंदीच्या काळात शालेय शुल्क भरण्याची सक्ती करू नये : वर्षा गायकवाड
3 Coronavirus : अर्थव्यवस्थेला फटका बसल्याने ठाकरे सरकारची खर्चाला मोठी कात्री
Just Now!
X