20 September 2020

News Flash

..तर नगरसेविकांना २५ हजार रुपये मानधन

महापालिकेत आपली सत्ता आल्यास नगरसेविकांना आमदारांप्रमाणेच प्रतिमाह २५ हजार रुपये मानधन आणि एक साहाय्यक देण्यात येईल,

| October 1, 2013 04:21 am

महापालिकेत आपली सत्ता आल्यास नगरसेविकांना आमदारांप्रमाणेच प्रतिमाह २५ हजार रुपये मानधन आणि एक साहाय्यक देण्यात येईल, असे आश्वासन लोकसंग्राम पक्षाचे आ. अनिल गोटे यांनी दिले. आपल्या पक्षाच्या वतीने महापालिका निवडणुकीत फक्त महिलांनाच उमेदवारी देण्यात येणार असल्याचे गोटे यांनी याआधीच जाहीर केले आहे.
येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत गोटे यांनी महापालिका निवडणुकीत पक्षाची भूमिका काय असेल ते मांडले. निवडणुकीत सर्व जागांवर महिलांना उमेदवारी देण्याच्या निर्णयाचे समर्थन करताना त्यांनी महिला शक्तीतून गुंडगिरी नष्ट करता येऊ शकेल असे कारण दिले. अशा प्रकारचे हे पहिलेच उदाहरण असेल. हा क्रांतिकारी निर्णय असून महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनी २ ऑक्टोबर रोजी लोकसंग्रामच्या वतीने ‘महिलाराज का?’ या सचित्र पुस्तिकेचे प्रकाशन माजी नगराध्यक्षा हेमा गोटे यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली.
दरम्यान पक्षाच्या वतीने महिलांना संधी दिली जाणार असल्याने नाराज झालेले पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश महाले, महानगरप्रमुख राजाराम पाटील आणि एकनिष्ठ म्हणून ओळखले जाणारे माजी नगरसेवक सुरेश जैन यांनीही पद व पक्षाचा राजीनामा दिला आहे. राजाराम पाटील यांनी लोकसंग्राम पक्षातील गटबाजी, चमचेगिरी यास अप्रत्यक्षपणे तेजस गोटे यांच्याकडून खतपाणी दिले जात असल्याची जाणीव राजीनामापत्रातून करून देण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे पक्षाचा राजीनामा देणाऱ्या महिलांनी घूमजाव करीत आपण पक्षाचेच काम करणार असल्याची भूमिका घेतली. धुळे शहर राजकीय गुंडांपासून मुक्त झाले पाहिजे, अशी आशा व्यक्त करीत महापालिकेतील भ्रष्टाचार महिलाच संपुष्टात आणू शकतील, असा दावा पत्रकात करण्यात आला आहे. त्यावर मंगला बागूल, भारती कोळेकर, हिराबाई बडगुजर, कमलाबाई देडगे, प्रतिभा लबडे, पुष्पा आहेर आदींची नावे आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2013 4:21 am

Web Title: corporator will get 25 thousand salary if win in municipal election anil gote
Next Stories
1 सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत राणेंकडून आमदारांचा समाचार
2 महामार्ग चौपदरीकरणासाठी रत्नागिरीत भूसंपादन सुरू
3 शासकीय योजना ऑनलाइन केल्याने जनतेचे प्रश्न सुटतील-राधाकृष्ण विखे
Just Now!
X