News Flash

‘अन्न सुरक्षा विधेयकात दुरुस्त्या विचाराधीन’

वर्षभरापूर्वी मंजूर अन्न सुरक्षा विधेयकातील तरतुदींची काटेकोर अंमलबजावणी करण्यात काही अडचणी आहेत. त्या दूर होऊन सर्व वंचितांना योजनेचा लाभ मिळावा, यासाठी अन्न सुरक्षा विधेयकात दुरुस्त्या

| May 31, 2014 01:40 am

वर्षभरापूर्वी मंजूर अन्न सुरक्षा विधेयकातील तरतुदींची काटेकोर अंमलबजावणी करण्यात काही अडचणी आहेत. त्या दूर होऊन सर्व वंचितांना योजनेचा लाभ मिळावा, यासाठी अन्न सुरक्षा विधेयकात दुरुस्त्या करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, असे केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा, तसेच ग्राहक संरक्षणमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर येथे प्रथमच आगमन झाल्यानंतर दानवे यांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. तसेच सायंकाळी महायुतीच्या वतीने शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सत्कार करण्यात आला. सत्कार समितीचे मुख्य संयोजक तथा जालना बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर अध्यक्षस्थानी होते. दानवे म्हणाले की, पतंग कितीही उंच उडाला, तरी त्याची दोरी जमिनीवरच्या माणसाच्या हातात असते. त्याप्रमाणे केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली, तरी आपले दोर खऱ्या अर्थाने जालनावासीय सामान्य जनतेच्या हातात आहेत. आता आपली जबाबदारी वाढली आहे. जिल्ह्य़ातील रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण आदी प्रश्नांची सोडवणूक करण्यास आपण प्रयत्न करू.
आमदार संतोष सांबरे, मिर्लेकर, जिल्हा सहसंपर्कप्रमुख शिवाजी चोथे, रिपब्लिकन पक्षाचे मराठवाडा अध्यक्ष अॅड. ब्रह्मानंद चव्हाण, माजी मंत्री हरिभाऊ बागडे, भाजप जिल्हाध्यक्ष बबन लोणीकर आदींची भाषणे झाली. शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर व ए. जे. बोराडे, जालना शहरप्रमुख विष्णू पाचफुले व बाला परदेशी, भाजप जिल्हा सरचिटणीस देवीदास देशमुख, जि. प. माजी अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, भाऊसाहेब पाऊलबुद्धे आदी उपस्थित होते.
‘युवकांसाठी दानवे आदर्श’
ग्रामपंचायत सदस्य ते केंद्रीय मंत्री असा दानवे यांचा राजकीय प्रवास युवकांसाठी आदर्श असल्याचे अर्जुन खोतकर यांनी सांगितले. पक्षाशी कायम एकनिष्ठ, सर्वसामान्यांशी संपर्क, १६-१६ तास अथक परिश्रम, तळागाळातील जनतेच्या समस्यांची जाण ठेवून ते सोडविण्याचा प्रयत्न करणारे नेते, अशा शब्दांत खोतकर यांनी दानवे यांचा गौरव केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2014 1:40 am

Web Title: correction in food security bill
टॅग : Food Security Bill
Next Stories
1 पंतप्रधान मोदींना भगवानगडावर आणणार – मुंडे
2 पंतप्रधान मोदींना भगवानगडावर आणणार – मुंडे
3 बनावट डॉक्टरांवर फौजदारीसंदर्भात कारवाईच्या परिपत्रकास तूर्त स्थगिती
Just Now!
X