25 November 2017

News Flash

कापसाच्या ट्रकला अपघात ; तीन मजूर ठार

कापसाने भरलेला मालट्रक उलटल्याने तीन मजूर ठार तर आठ जण जखमी झाले. मुक्ताईनगर तालुक्यातील

वार्ताहर, जळगाव | Updated: January 28, 2013 5:02 AM

कापसाने भरलेला मालट्रक उलटल्याने तीन मजूर ठार तर आठ जण जखमी झाले. मुक्ताईनगर तालुक्यातील निमसे गावाजवळ हा अपघात झाला. हे सर्व मजूर शिरपूर तालुक्यातील हिसाळे येथील आहेत.
मुक्ताईनगर-बोदवड रस्त्यावरील निमखेडी गावालगतच्या वळणावर रविवारी झालेल्या या अपघातानंतर चालक पळून गेला. शिरपूर येथे ललित जैन या व्यापाऱ्याने सारोळा येथील शेतकऱ्याकडून कापूस खरेदी केला होता. हा कापूस वाहून नेण्यासाठी मजुरांसह ट्रकही शिरपूरहूनच आणला होता. सारोळ्याहून कापूस भरून निघालेला भरधाव ट्रक निमखेडीजवळच्या वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटला. त्यामुळे ट्रकवर बसलेले मजूर त्याखाली दाबले गेले. त्यापैकी मच्छिंद्र भिल, समाधान भिल यांसह तिघांचा जागीच मृत्यू झाला. कांतीलाल कोळी, सुरेश चौधरी, संतोष भिल, हरी पाटील व सुनील भिल यांसह आठ जण जखमी आहेत.

First Published on January 28, 2013 5:02 am

Web Title: cotton truck met with an accident 3 died
टॅग Accident