प्रतिनिधी

पूलगाव पोलीस हद्दीत येणाऱ्या गुंजगाव येथील रवी नानाजी कात्रे या युवकाचे गावातीलच एका १९ वर्षीय मुलीशी प्रेमसंबंध होते, अनेक दिवसांपासून असलेल्या या प्रेमापोटी दोघांनीही चार दिवस आधी घरून पलायन केले. त्यांच्या शोधात कुटुंबीय असतांनाच गावातीलच एकनाथ ब्राम्हणकर यांच्या शेतातील विहिरीत दोघांचे मृतदेह सायंकाळी साडेसात वाजता तरंगताना आढळून आले.

पोलिसांना माहिती झाल्यावर त्यांनी गावकऱ्यांची मदत घेऊन मृतदेह बाहेर काढले. हे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेबाबत विविध तर्क लावले जात आहेत. गावात प्रेम संबंधस विरोध असल्याने आत्महत्या केल्याची चर्चा होत आहे. दरम्यान पूलगाव पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.