28 February 2021

News Flash

चिंधवलीत विजेच्या धक्‍क्‍याने दाम्पत्य ठार

या तारेस स्पर्श होताच  शितल यांना जोरदार विजेचा धक्का बसला.

सौ. शीतल पवार वय २६ व तुषार पवार )असे ठार झालेले दाम्पत्य

पावसाळी वातावरण झाल्याने घराशेजारील गोठ्यात सुकत टाकलेली कपडे काढण्यासाठी गेलेली महिला व तिला वाचवण्यासाठी गेलेला पती विजेच्या धक्‍क्‍याने मृत्यूमुखी पडले. सौ. शीतल पवार वय २६ व तुषार पवार रा. चिंधवली ( ता. वाई )असे ठार झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे.

शितल पवार या पावसाळी वातावरण झाल्याने गोठ्यातील तारेवर सुकत टाकलेली कपडे आणण्यास गेल्या होत्या. याच गोठ्यात असलेली कडबा कुट्टीची वायर पत्र्याला चिकटली होती.त्यामुळे पत्र्यातून तारेत विद्युत प्रवाह येत होता. या तारेस स्पर्श होताच  शितल यांना जोरदार विजेचा धक्का बसला. त्यांच्या आवाजाने पती तुषार पवार त्याठिकाणी धावले. पत्नीला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांनाही विजेचा धक्का बसला. या घटनेत दोघेही मृत्यूमुखी पडले. दाम्पत्यास एक वर्षाची मुलगी असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.या घटनेची नोंद भुईंज पोलिस ठाण्यात झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2018 11:44 pm

Web Title: couple killed due to electric shock in wai
Next Stories
1 मुंबईत दारासमोरुन बकऱ्या चोरल्या, माहिती देणाऱ्याला १ लाखाचे इनाम
2 दक्षिण मुंबईतील सिंदिया हाऊसला आग, जिवित हानी नाही
3 पिंपरी चिंचवडमध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस, पाहा व्हिडिओ
Just Now!
X