News Flash

दोन हजार फूट खोल दरीत उडी घेऊन दाम्पत्याची आत्महत्या

राधा (२२) व गणेश  (२५) शहापूरचे रहिवासी असून दोन वर्षांपूर्वीच त्यांचे लग्न झाले होते.

गणेश आणि राधा हेकडे

अमरावती : कौटुंबिक वादाला कंटाळून विवाहित जोडप्याने चिखलदरा येथील दोन हजार फूट खोल दरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. राधा आणि गणेश हेकडे असे या दाम्पत्याचे नाव आहे.

राधा (२२) व गणेश  (२५) शहापूरचे रहिवासी असून दोन वर्षांपूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. घरगुती वादाला कंटाळून राधा तीन आठवडय़ापूर्वी तिच्या माहेरी मोथा या गावी निघून गेली होती. गणेशने राधाची समजून काढून तिला परत आणले. परत येताना चिखलदरा येथील भीमकुंडच्या दरीत उडी घेऊन त्यांनी जीवन संपवले. त्या दोघांना एक छोटा मुलगा आहे.

माहेर सोडल्यावर राधाने तिच्या काकाला फोन लावला. आम्ही दोघे आत्महत्या करणार असल्याचे तिने सांगितले. यानंतर दोघांनीही त्यांचे फोन बंद करून ठेवले. त्यांनी त्यांचा शोध घेतला. दोघे दुचाकीने शहापूरला गेले असे वाटले. पण, तेथेही आढळले नाही तेव्हा चिखलदरा पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी भीमकुंडावर  पाहणी केली असता दोघांनीही आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. या दरीत आधीही आत्महत्या झाल्या आहेत. गणेश हा कुस्तीपटू असल्याची माहिती मिळाली आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेत त्याचा प्रथम क्रमांक आला होता. तो हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा विद्यार्थी होता. गणेशने काही दिवसांपूर्वीच मुलाला घरी आणले होते. त्यामुळे तो बचावला.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2019 3:30 am

Web Title: couple suicide by taking jump in two thousand feet deep valleys
Next Stories
1 तीन विद्यार्थ्यांचा नाल्यात बुडून मृत्यू
2 ‘त्या’ ३६ वाहनांची जाळपोळ हा मोठय़ा हल्ल्यासाठीचा सापळाच!
3 बंदुकीच्या जोरावर नव्हे, तर संवादाने प्रश्न सुटतील- हजारे
Just Now!
X