03 June 2020

News Flash

अन्नात विष कालवून जीवे मारण्याचा प्रयत्न; पत्नीसह तिघांविरुद्ध गुन्हा

पोलिसांनी संगनमताने खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार असल्याने त्यांचा शोध सुरू आहे

प्रतिनिधिक छायाचित्र

अन्नात विष कालवून एकाच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रमार समोर आला आहे. या प्रकरणी नागपूर प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकुनबाई शिवा सहारे, मोरेश्वर गेंदलाल मारबते आणि कविता भगवान वयले सर्व रा. गोंडेगाव, जुनी कामठी अशी आरोपींची नावे आहेत. शिवा चिंधूजी सहारे (४५) रा. गोंडेगाव असे फिर्यादीचे नाव आहे. शिवाचा आपल्या पत्नीसोबत वाद सुरू होता. या वादातून २३ एप्रिलला त्यांच्या अन्नात विष कालवून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, त्यातून ते बचावले. त्यांनी पत्नी व तिच्या नातेवाईंकांविरुद्ध पोलिसांत तक्रार केली.

पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमक्ष अर्ज केला. या अर्जावर सुनावणी झाल्यानंतर न्यायदंडाधिकाऱ्यांनी पोलिसांना गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी संगनमताने खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार असल्याने त्यांचा शोध सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 9, 2019 4:38 pm

Web Title: court order nagpur nck 90
Next Stories
1 Ayodhya verdict : राम मंदिरात जाण्याचा फडणवीस यांचा निर्णय रद्द
2 Ayodhya Verdict: ‘आधी मंदिर मग सरकार’; संजय राऊतांची गुगली
3 दुर्देवी ! सोलापूरात मुलाला वाचविताना वडिलांचाही मृत्यू
Just Now!
X