गंगाखेड शुगर अ‍ॅन्ड एनर्जी प्रा. लि.चे अध्यक्ष रत्नाकर गुट्टे यांचा जामीन अर्ज आज बुधवारी (दि. २६) येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश इनामदार यांनी फेटाळला.

गंगाखेड शुगरच्या कार्यक्षेत्रातील २२९८ शेतक ऱ्यांच्या ३२८ कोटी रुपयांचे परस्पर कर्ज उचलल्याप्रकरणी गुट्टे गेल्या तीन महिन्यांपासून परभणीच्या तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहे. येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचेकडे गुट्टे यांच्या वतीने जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. जामीन अर्जावर सोमवारी (दि.२४) दोन्ही पक्षाकडून युक्तिवाद झाल्यानंतर आज बुधवारी न्यायाधीश इनामदार यांनी जामीन अर्ज फेटाळला असल्याची माहिती सरकारी पक्षाचे वकील अ‍ॅड. गांजापूरकर व फिर्यादीचे वकील मयूर लोढा यांनी सांगितले. गंगाखेड शुगर अ‍ॅन्ड एनर्जीचे अध्यक्ष गुट्टे यांच्या जामीन अर्जाकडे गंगाखेड विधानसभा मतदार संघासह परभणी जिल्ह्याचे लक्ष लागले होते.