News Flash

Covid -19 : राज्यात दिवसभरात ७ हजार ४३६ जण करोनामुक्त ; १९५ रूग्णांचा मृत्यू

६ हजार १२६ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत.

Corona Maharashtra
राज्यात आज रोजी एकूण ४९,६७१ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.(संग्रहीत)

राज्यातील ११ जिल्हे सोडून अन्य जिल्ह्यांमध्ये सोमवारपासून करोनाचे निर्बंध राज्य सरकारकडून शिथिल करण्यात आलेले आहेत. करोनाचा प्रादुर्भाव कमी असलेल्या जिल्ह्यांना ही सूट देण्यात आलेली आहे. तर, अद्यापही काही जिल्ह्यांमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने, तिथे निर्बंध कायम ठेवण्यात आलेले आहेत. राज्यातील करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे सांगितले जात असले, तरी देखील अद्यापही राज्यात दररोज मोठ्यासंख्येने करोनाबाधित आढळून येत आहेत, शिवाय करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. तसेच, रूग्ण करोनातून बरे देखील होत आहेत. राज्यात रोज आढळून येणाऱ्या करोनाबाधितांची संख्या ही करोनातून बरे होत असलेल्यांच्या तुलनेत कधी जास्त तर कधी कमी आढळून येत आहे. आज दिवसभरात राज्यात ७ हजार ४३६ रूग्ण करोनातून बरे झाले असून, ६ हजार १२६ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. तर, १९५ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ६१,१७,५६० करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९६.६९ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६३,२७,१९४  झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १३३४१० करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,८७,४४,२०१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,२७,१९४ (१२.९८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,४७,६८१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,९२८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ७२,८१० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2021 8:31 pm

Web Title: covid 19 7 thousand 436 people recovered from corona in a day in the state 195 patients died msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “चंद्रकांत दादांना मला आठवण करून द्यायचीये की जर…”, मराठा आरक्षणावरून अशोक चव्हाणांचा सवाल!
2 केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला हा गैरसमज – अशोक चव्हाण
3 ताडोबात आढळला अतिदुर्मिळ ‘तणमोर’; पक्षी प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण