News Flash

करोना नियमावली: उद्धव ठाकरेंची सूचना राष्ट्रवादी पाळणार, गर्दीच्या कार्यक्रमांना बंदी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत गर्दी होईल असे कार्यक्रम न घेण्याचं आवाहन केलं आहे

Covid 19, NCP, Nawab Malik, Maharashtra CM Uddhav Thackeray,
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत गर्दी होईल असे कार्यक्रम न घेण्याचं आवाहन केलं आहे (File Photo)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत गर्दी होईल असे कार्यक्रम न घेण्याचं आवाहन केलं आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने गर्दी होईल अशा कार्यकमांचं आयोजन न करण्याचा निर्णय घेताल आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिील आहे. गर्दी टाळण्यासाठी पाऊले टाकली पाहिजेत ही आपल्या पक्षाची भूमिका असल्याचं ते म्हणाले आहेत.

“गर्दी होईल असा एकही राजकीय कार्यक्रम घेण्यास पक्षाच्या वतीने मनाई करण्यात आली आहे. पक्षाच्या माध्यमातून तसे कार्यक्रम होणार नाहीत ही पक्षाची भूमिका आहे,” अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.

“गर्दी करणारे राजकीय, धार्मिक कार्यक्रम नकोच”, मुख्यमंत्र्यांचं राज्यातील पक्ष-संघटनांना आवाहन

राज्यातील सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम घेऊन गर्दी जमवू नका किंवा एखाद्या कार्यक्रमातून गर्दी होईल असा कार्यक्रम घेऊ नका. थोडे दिवस थांबा असा आग्रह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेटमध्ये धरला आणि तशा सूचना तिन्ही पक्षांच्या पदाधिकार्‍यांना केल्या आहेत अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली. “त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता गर्दी टाळण्यासाठी पाऊले टाकली पाहिजेत ही पक्षाची भूमिका असल्याचंही,” नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.

गर्दी करणारे राजकीय, धार्मिक कार्यक्रम नकोच- उद्धव ठाकरे

गेल्या काही दिवसात राज्यात पुन्हा एकदा करोना रुग्णांच्या संख्येत किंचित वाढ झाल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील पक्ष आणि संघटनांना कळकळीची विनंती केली आहे. “मागील लाटेचा अनुभव लक्षात घेता, मी सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांना विनंती करतो की, त्यांनी गर्दी होणारे राजकीय कार्यक्रम, सभा ,मोर्चे त्वरित स्थगित करावेत. इतर कार्यक्रम काटेकोरपणे नियमांत राहून साजरे करू शकता. मात्र आता आपल्याला मुळात तिसरी लाट येऊच द्यायची नाही, जनतेच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य द्या.”, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2021 3:29 pm

Web Title: covid 19 ncp nawab malik maharashtra cm uddhav thackeray political program sgy 87
Next Stories
1 “उद्या राज कुंद्रा भाजपामध्ये गेले तर ‘ते’ व्हिडीओ रामायणाचे होतील का?”, नाना पटोलेंचा सवाल
2 करुणा शर्मा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
3 “गर्दी करणारे राजकीय, धार्मिक कार्यक्रम नकोच”, मुख्यमंत्र्यांचं राज्यातील पक्ष-संघटनांना आवाहन
Just Now!
X