News Flash

Covid -19 : राज्याचा ‘रिकव्हरी रेट’ ९७.०४ टक्के ; दिवसभरात ४ हजार ३६० जण करोनामुक्त

४ हजार ३१३ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, ९२ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे

corona maharashtra Update
राज्यात आज रोजी एकूण ४९,३४२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.(प्रातिनिधिक छायाचित्र)

राज्यात आज दिवसभरात ४ हजार ३६० जण करोनातून बरे झाले आहेत. तर, ४ हजार ३१३ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, ९२ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील करोनाच्या दुसऱ्या लाटेच प्रभाव अद्यापही म्हणावा तसा कमी झालेला दिसत नाही, कारण करोनातून रूग्ण बरे जरी होत असले तरी अद्यापही दररोज करोनाबाधित आढळून येत आहेत. शिवाय, कोरनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. राज्यात रोज आढळून येणारी नवीन करोनाबाधितांची संख्या ही करोनातून बरे झालेल्यांच्या तुलनेत कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे. शिवाय, राज्य शासनाने निर्बंध जरी शिथिल केलेल असले, तरी देखील करोना रूग्ण संख्येत जर पुन्हा पूर्वीप्रमाणे वाढ होऊ लागली, तर पुन्हा एकाद लॉकडाउन लावला जाऊ शकतो. असा देखी इशारा सरकारकडून दिला जात आहे आणि करोना प्रतिबंधात्मक नियमांचे सर्वांनी आवर्जुन पालन करावे असे सांगितले जात आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ६२,८६,३४५ करोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०४ टक्के एवढे झाले आहे.

आता राज्यातील करोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या ६४,७७,९८७ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १३७६४३ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,४४,८७,९५० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,७७,९८७ (११.८९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,९८,०९८ व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत. तर, १ हजार ९५४ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात आज रोजी एकूण ५०,४६६ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 3, 2021 8:17 pm

Web Title: covid 19 states recovery rate 97per cent during the day 4360 people were cured of coronavirus msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 OBC Political Reservation : ‘इम्पेरिकल डेटा’ तयार करण्याबाबत सर्वपक्षीय बैठकीत सहमती
2 “इम्पेरिकल डेटा केंद्रानेच दिला पाहीजे”, छगन भुजबळांनी स्पष्ट केली भूमिका!
3 ओबीसींचं राजकीय आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत निवडणुका नको – फडणवीस
Just Now!
X