News Flash

महाराष्ट्रातून करोना लाट ओसरेना?; जुलैच्या पहिल्या १० दिवसात राज्याची चिंता वाढवणारी आकडेवारी

महाराष्ट्रात एकूण आठ जिल्ह्यांमधील परिस्थिती सध्या चिंताजनक

Coronavirus Maharashtra Update, COVID-19 Cases Maharashtra
करोनाच्या दुसऱ्या लाटेला सहा महिने पूर्ण होऊनदेखील महाराष्ट्र रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढतीये (File Photo: PTI)

करोनाची दुसरी लाट येऊन सहा महिने पूर्ण होत असतानाही अद्याप महाराष्ट्रात परिस्थिती नियंत्रणात आली नसल्याचं चित्र आहे. राज्यातील आकडेवारीने पुन्हा एकदा प्रशासनाची चिंता वाढवली आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला पहिल्या १० दिवसांत महाराष्ट्र आणि केरळमध्ये गेल्या १६ महिन्यातील सर्वाधिक रुग्णवाढ पहायला मिळाली आहे. महाराष्ट्रात फक्त गेल्या १० दिवसांत तब्बल ७९ हजार ५९५ नवे रुग्ण आढळले आहेत. तर दुसरीकडे केरळमध्ये १ लाख २८ हजार नवे रुग्ण आढळले आहेत. यासोबत महाराष्ट्र आणि केरळ पुन्हा एकदा देशातील एकूण रुग्णसंख्येत सर्वाधिक वाटा असणारी राज्यं झाली आहेत. देशातील एकूण रुग्णसंख्येत महाराष्ट्र आणि केरळचा ५३ टक्के वाटा आहे.

विशेष बाब म्हणजे करोनाच्या दुसऱ्या लाटेत दैनंदिन रुग्णसंख्या २५ हजारांच्या पुढे गेलेल्या दिल्लीत परिस्थिती नियंत्रणात आली आहे. १ ते १० जुलै दरम्यान दिल्लीत फक्त ८१७ नवे रुग्ण आढळले आहेत. अनेक महत्वाच्या शहरांमध्ये रुग्णसंख्या दोन आकडी आहे.

निर्बंधांची कठोर अंमलबजावणी करा, अन्यथा ते रद्द करावेत

करोनाच्या दुसऱ्या लाटेला सहा महिने पूर्ण होऊनदेखील महाराष्ट्र आणि केरळमध्ये रुग्णसंख्या इतक्या मोठ्या प्रमाणात का वाढतीये याचं कोणतंही योग्य उत्तर मिळू शकलेलं नाही. याबाबत अनेक अंदाज व्यक्त केलं जात आहे. दरम्यान दोन्ही राज्यातील सार्वजनिक आरोग्य अधिकारी पारदर्शकता आणि योग्य माहिती देण्यात असल्याने आमची संख्या जास्त दिसत असल्याचं म्हटलं आहे.

करोनाची दुसरी लाट पुन्हा एकदा कहर करत असल्याचीही शक्यता व्यक्त होत आहे. “करोनाच्या लाटेने शिखर गाठले असताना दोन्ही राज्यांमध्ये रुग्ण आढळले होते. रुग्णसंख्या वाढत असल्याने रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत,” अशी माहिती मुंबईतील एका डॉक्टरांनी ओळख जाहीर न करण्याच्या अटीवर दिली आहे.

धक्कादायक! एकाच वेळी महिलेला करोनाच्या दोन वेगळ्या विषाणूंची लागण; उपचारादरम्यान मृत्यू

महाराष्ट्रातील डॉक्टरांनी कोल्हापूरमधील परिस्थिती चिंताजनक होत असल्याचं सांगितलं असून दुसऱ्या लाटेने पुन्हा एकदा आक्रमक रुप धारण केल्याची शक्यता वर्तवली आहे. कोल्हापुरात दैनंदिन रुग्णसंख्या तीन हजारांवर पोहोचली आहे. कोल्हापुरात सर्वाधिक लसीकरण झालं असून दैनंदिन रुग्णसंख्येतही कोल्हापूरच पहिल्या क्रमांकावर असल्याचं डॉक्टर शशांक जोशी यांनी सांगितलं आहे. करोनाची लागण होणाऱ्यांमध्ये लसीकरण न झालेल्या तरुणांची संख्या जास्त असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या वेळी करोना शिखर गाठत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने करोना व्हायरस अद्यापही फैलावत असल्याची भीती साथरोगतज्ञ डॉक्टर गिरीधर बाबू यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात एकूण आठ जिल्ह्यांमधील परिस्थिती सध्या चिंताजनक असल्याचं एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2021 9:00 am

Web Title: covid second wave maharashtra caseload in first 10 days of july over 79500 sgy 87
Next Stories
1 ..हे अमित शाह यांची बदनामी करणारे; सहकार क्षेत्रावरुन शिवसेनेने मांडली भूमिका
2 Maharashtra Covid vaccination : लसीकरण कासवगतीने
3 सहकार कायद्यात केंद्राचा हस्तक्षेप अशक्य!
Just Now!
X