भारतीय कम्युनिस्ट पक्ष व आयटकचे राष्ट्रीय नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना अद्याप अटक करण्यात येत नसल्याच्या निषेधार्थ २ मार्च रोजी ११ वाजता येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे.
या वेळी पानसरे यांच्या अस्थींना अभिवादनही करण्यात येणार आहे. मारेकऱ्यांना अटक करा, म्हणून स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे. या आंदोलनात नाशिककरांनी मोठय़ा प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव राजू देसले, शहर सचिव दत्तू तुपे, संगीता उदमले, शिवाजी लांडे आदींनी केले आहे.