हरहुन्नरी कलावंत आणि घराघरात पोहोचलेल्या ‘चिंटू’ या चित्रमालिकेचे निर्माते प्रभाकर वाडेकर (वय ५६) यांचे मेदूतील रक्तस्रावामुळे शनिवारी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. प्रभाकर वाडेकर यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. चित्रपट, नाटय़, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह गणेश मंडळांचे कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.
प्रभाकर वाडेकर यांचा जन्म ८ ऑगस्ट १९५६ रोजी झाला. नू. म. वि. प्रशाला आणि बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय येथे त्यांचे शिक्षण झाले. शालेय वयापासून नाटकात काम करणाऱ्या प्रभाकर यांनी महाविद्यालयीन दशेत काळाच्या पुढची नाटके रंगमंचावर सादर करून पुरुषोत्तम करंडक स्पर्धा गाजविली. ‘अर्थ काय बेंबीच्या विश्वचक्री’, ‘मंथन’ आणि ‘ओंडका’ या एकांकिका त्यांनी सादर केल्या. ‘ड्रॉपर्स’ या संस्थेमध्ये अनंत कान्हो कुलकर्णी दिग्दर्शित ‘कोसळे आज इथे देव्हारा अर्थात मेलो मेलो मेलो ड्रामा’ या नाटकात प्रभाकर आणि सुहास कुलकर्णी ही जोडगोळी होती. अरुण काकतकर यांची निर्मिती व दिग्दर्शन असलेल्या ‘म्हातारीचा काळ’नाटकाचे लेखन वाडेकर यांनी केले होते.

thane, Shivsainik Viral message, Praises BJP MLA Sanjay Kelkar, Rajan Vichare, chaitra Navratri Festival, Sanjay Kelkar attennded Rajan Vichare Navratri, Rajan Vichare s Navratri Festival, thane navratri festival,
कडवट शिवसैनिक म्हणतो…, आनंद दिघेनंतर आमदार संजय केळकर करताहेत निस्वार्थपणे काम
kannada producer Soundarya Jagadish found dead
घरात मृतावस्थेत आढळले प्रसिद्ध चित्रपट निर्माते, काही दिवसांपूर्वी त्यांच्या पबविरोधात दाखल झाला होता गुन्हा
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?