राज्यातील करोनाचा विषाणू संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर या कार्यात मदत करु इच्छिणाऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या नव्या खात्याची निर्मिती करण्यात आली आहे. या खात्यात इच्छुकांनी सढळ हाताने मदत जमा करावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

करोनाशी लढण्यासाठी मदत मिळावी यासाठी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी – कोविड १९’ या नावाने नवं बँक खातं सुरु करण्यात आलं आहे. या खात्यात जनतेनं सढळ हाताने मदत करावी अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

दरम्यान, करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि बाधित रुग्णांच्या मदतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पंतप्रधान सहाय्यता आणि आपत्कालिन स्थिती मदत निधी’ची (पीएम-केअर्स) स्थापना केली आहे. सर्व क्षेत्रातील लोकांना या निधीमध्ये आपली मदत पाठवता येणार आहे.