News Flash

शहीद उत्तम भिकले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

जम्मू परिसरात अतिरेक्यांच्या गोळीबारात वीरमरण आलेल्या गडिहग्लज तालुक्यातील हडलगे गावचे सुपुत्र उत्तम बाळू भिकले (वय ३०) या शहीद जवानाच्या पार्थिवावर उद्या मंगळवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

| May 19, 2014 03:12 am

जम्मू परिसरात अतिरेक्यांच्या गोळीबारात वीरमरण आलेल्या गडिहग्लज तालुक्यातील हडलगे गावचे सुपुत्र उत्तम बाळू भिकले (वय ३०) या शहीद जवानाच्या पार्थिवावर उद्या मंगळवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सोमवारी कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी भिकले कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. मुश्रीफ फाऊंडेशनच्या वतीने २ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. भिकले हे २ मराठा लाईट इन्फंट्रीचे जवान होते. हडलगे पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे.
गडिहग्लज व चंदगड तालुक्यांच्या मध्यावर असणाऱ्या, गडिहग्लज तालुक्याचे शेवटचे टोक असणाऱ्या सुमारे साडेचार हजार लोकवस्तीच्या हडलगे या छोटय़ाशा खेडय़ातील उत्तम बाळू भिकले (वय ३०) हा जवान जम्मू-काश्मीर येथे अतिरेक्यांशी लढताना शहीद झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. उत्तम भिकले शहीद झाल्याची माहिती त्यांचे नातेवाईक असलेले सुभेदार मेजर दशरथ भिकले यांनी दिली. हे वृत्त समजताच हडलगे गावचे सर्व व्यवहार बंद करण्यात आले. या घटनेची माहिती मिळविण्यासाठी रात्री उशिरापर्यंत ग्रामस्थ धडपडत होते. उत्तम यांच्या आई, वडील व पत्नीला या घटनेची सविस्तर माहिती देण्यात आली नव्हती. उत्तम केवळ गोळी लागून जखमी झाल्याची माहिती घरच्यांना दिली होती. सायंकाळी पाचच्या सुमारास भिकले शहीद झाल्याचे वृत्त गावात समजल्यावर सारा गाव शोकसागरात बुडाला आहे. एप्रिल महिन्यात ते गावी सुटीवर आले होते. एप्रिलला ते पुन्हा जम्मूकडे सेवा बजावण्यास गेले होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी सुगंधा, दोन वर्षांची मुलगी श्रेया, भाऊ, बहीण व भावजय असा परिवार आहे. मंगळवारी सकाळी ७ वाजता पार्थिव हेडलगे गावात आणले जाणार आहे. अंत्ययात्रेची मिरवणूक निघाल्यानंतर ९ वाजता गावाजवळील गायरानात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2014 3:12 am

Web Title: cremated today on martyr uttam bhikale 2
Next Stories
1 राज्यातील काही दिवसांची सत्ता उपभोगा
2 राज्यातील काही दिवसांची सत्ता उपभोगा
3 गॅसच्या स्फोटात इचलकरंजीत सहा जखमी
Just Now!
X