News Flash

क्रिकेटच्या वादातून धुळ्यात दंगल; दोन ठार

लहान मुलांमध्ये क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या वादाचे पर्यावसन शहरातील कसाबवाडा-मच्छी बाजार परिसरात दंगलीत होऊन दोन जणांना प्राण गमवावे लागले.

| May 17, 2015 04:55 am

लहान मुलांमध्ये क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या वादाचे पर्यावसन शहरातील कसाबवाडा-मच्छी बाजार परिसरात दंगलीत होऊन दोन जणांना प्राण गमवावे लागले. या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  दुहेरी खून व सशस्त्र हाणामारी प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शहरातील गल्ली क्रमांक सातजवळील कसाबवाडा-मच्छी बाजार परिसरातील काही मुले क्रिकेट खेळत होती. त्यांच्यात खेळण्यावरून काही वाद झाले. हा वाद कुटुंबियांपर्यंत पोहोचल्यानंतर शुक्रवारी रात्री दोन्ही गटांचा जमाव जमा झाला आणि धुमश्चक्री उडाली. जमावाने काठय़ा, तिक्ष्य हत्यारांचा वापर केला. त्यात ८ ते १० जण जखमी झाले. त्यातील अन्सारी हुसेन अब्बास (४०) आणि यासीर अफराज (२८) यांचा मृत्यू झाला. तर अख्तर हुसेन अब्बास, अख्तर हुसेन अब्दुल हैद, यासीन मोहंमद अख्तर, मोहंमद अब्दुल मोहंमद, मोहंमद इरफान मोहंमद हे जखमी झाले. दोन्ही गटांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. नासीर हुसेन यांच्या तक्रारीवरुन आसिफ मोहंमत अस्लम अन्सारी, यासीर मोहंमद अन्सारी, अस्लम समीउल्ला अन्सारी, फसल शकील मोहंमद अन्सारी, रेहान मोहंमद इरफान अन्सारी, सैफ इरफान अन्सारी या सात जणांविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शनिवारी परिसरात तणावपूर्ण शांतता होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2015 4:55 am

Web Title: cricket clash two killed in dhule
Next Stories
1 चोपडा तालुक्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार
2 नाल्याच्या पाण्यात बालिका बेपत्ता
3 तोटय़ातील महामंडळ ‘स्वाभिमानी’च्या गळ्यात
Just Now!
X