News Flash

सचिन तेंडुलकरही शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक !

राज्यभरात शिवजयंतीचा जोरदार उत्साह

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. राज्यातूनच नव्हे तर संपूर्ण देशभरात रयतेला स्वराज्याचा खरा अर्थ समजावून सांगणाऱ्या शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमीत्त अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व अन्य मान्यवर नेत्यांनीही आजच्या दिवशी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन छत्रपतींना आदरांजली वाहिली आहे. यामध्ये महाराष्ट्राचा लाडका क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचीही भर पडली आहे. सचिननेही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमीत्त शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने मराठीमधून केलेल्या ट्विटला त्याच्या चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

महाराष्ट्रातील अनेक गड-किल्ल्यांवरही आज शिवजयंतीचा उत्साह दिसून येत आहे. समृद्ध आणि कणखर महाराष्ट्राचा पाया रचणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना आज मानवंदना वाहण्यात येत असून, विविध माध्यमातून अनेकांनीच या राजाचं राजेपण जपत त्यांना अभिवादन केल्याचे पाहायला मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2019 12:56 pm

Web Title: cricket icon sachin tendulkar paid tribute to chatrapati shivaji maharaj on his birth anniversary
टॅग : Sachin Tendulkar
Next Stories
1 जयंती विशेष: शिवाजी महाराजांची ‘राजमुद्रा’ नेमकं काय सांगते
2 Pulwama Terror Attack: रजा मंजूर झाल्याने बसमधून उतरला अन् पारनेरचा जवान बचावला
3 शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर श्रीपाद छिंदमला आज नगरमध्ये शहरबंदी
Just Now!
X