03 June 2020

News Flash

विनयभंग करणाऱ्या डॉक्टरविरुद्ध गुन्हा

संशयित डॉक्टरला ताब्यात घेण्यात आले आहे.

संग्रहित छायाचित्र

शहरातील सप्तश्रृंगी मंदिरासमोरील संकुलात असणाऱ्या दातांच्या दवाखान्यात उपचारासाठी आलेल्या विवाहितेचा विनयभंग केल्या प्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित डॉक्टरला ताब्यात घेण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील विवाहिता रात्री साडेआठच्या सुमारास दाताच्या दुखण्यावर उपचारासाठी सासऱ्यांसमवेत दवाखान्यात आली होती. दातांची तपासणी करताना संशयित डॉक्टर महेश जोशीने विवाहितेच्या सासऱ्यास करोनाची साथ सुरू असल्याचे निमित्त सांगून बाहेर काढले. नंतर विवाहितेचा विनयभंग केला. हा प्रकार कुणाला सांगितल्यास बदनामी  करण्याची धमकी डॉक्टरने दिली. सकाळी पीडितेने संबंधित प्रकार घरी सांगितल्यानंतर कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2020 1:04 am

Web Title: crime against a doctor for molestation abn 97
Next Stories
1 रायगड जिल्ह्यात करोना बळींची संख्या ३०
2 सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात आणखी ८ करोनाबाधित रुग्ण
3 टंचाईच्या झळा वाढल्या; ८४ टँकरने पाणीपुरवठा
Just Now!
X