सीमा ओलांडून चुकून पाकिस्तानात गेलेले आणि नंतर मायदेशी परतलेले जवान चंदू चव्हाण यांच्या विरुद्ध धुळे लोकसभा मतदारसंघात भाजप समर्थनार्थ समाजमाध्यमातून संदेश दिल्याबद्दल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

चंदू चव्हाण यांना मायदेशी आणण्यासाठी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी चंदू हे धुळे तालुक्यातील असल्याने अधिक प्रयत्न केले होते. लोकसभा निवडणुकीत समाजमाध्यमांद्वारे भाजप उमेदवाराचा प्रचार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. फेसबुकवर त्यांनी भाजप समर्थनार्थ संदेश दिले असून धुळे मतदारसंघातील उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्यासोबत असलेले आपले छायाचित्रही त्याने टाकले आहे.यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग  झाल्याने प्रशासकीय अधिकारी अभिनव पवार यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात रविवारी दुपारी तक्रार दिली होती.