केवळ महाराष्ट्रातच नव्हे आंध्र प्रदेश व कर्नाटकातही भक्त परिवार असलेल्या मल्लिनाथ महाराज यांच्याविरुद्ध रविवारी एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरून शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईने एकच खळबळ उडाली असून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी एकाही आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नाही.
नांदेड जिल्ह्यात तसेच लगतच्या आंध्र प्रदेश व कर्नाटकमध्ये मल्लिनाथ महाराजांचे अनेक भक्त आहेत. शहरालगत असलेल्या विष्णुपुरी, मरळक येथे त्यांचे आश्रम आहे. शिवाय राज्याच्या अन्य भागातही त्यांचे आश्रम आहेत. नांदेड शहरात राहणाऱ्या एका ४० वर्षीय महिलेला तू माझ्या लग्नाची पत्नी आहेस, असे भासवून मल्लिनाथ महाराजांनी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. एवढेच नव्हे तर अन्य काही भक्तांच्या मदतीने तिच्याकडून १४ ते १५ लाख रुपये उकळले. शनिवारी रात्री पीडित महिला िलबगाव पोलीस ठाण्यात गेली. याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपल्यावर झालेल्या अन्यायाची कैफियत तिने लेखी स्वरूपात दिली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक विजय डोंगरे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. शिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही ही माहिती दिली. पोलीस उपअधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तत्काळ िलबगाव पोलीस ठाण्यात दाखल झाले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोन महिला पोलीस अधिकाऱ्यांना पीडित महिलेवर झालेल्या अन्यायाबाबत माहिती घेण्यासंदर्भात सांगितले. सर्व अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर मल्लिनाथ महाराज, ललिताबाई, कानडेबाई, चालक प्रकाश व रमाकांत जोशी या पाच जणांविरुद्ध फसवणूक करणे, शारीरिक संबंध ठेवणे, संगनमत करणे आदी आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला.

Bhaskar Jadhav On MNS Raj Thackeray
‘मनसेने महायुतीला पाठिंबा दिला की द्यायला लावला?’, भास्कर जाधव यांचा सवाल
Solapur Murder wife, Solapur, Murder second wife,
सोलापूर : तीन घरांच्या दादल्यात आर्थिक कारणांवरून दुसऱ्या पत्नीचा खून, रक्ताने माखलेल्या चाकूसह पती पोलिसांत हजर
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
solapur shivsena crime news marathi, shivsena district president manish kalje marathi news
हाॅटेल व्यवस्थापकाला मारहाण करून मोबाईल हिसकावला; शिवसेना जिल्हाप्रमुखावर गुन्हा दाखल