कर्जत : एका पाच वर्षीय चिमुरडीवर अत्याचार प्रकरणी आरोपीस पोलीस  कोठडी देण्यात आली. या प्रकरणी मुलीच्या आईने रात्री उशिरा जामखेड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सचिन शालन पवार (वय ३२) याच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस न्यायालयाने  ३० जानेवारीपर्यंत  पोलीस कोठडी दिली आहे

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दोन दिवसांपूर्वी मंगळवार, दि २१ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पीडित चिमुरडी आरोपी सचिन शालन पवार याच्या घरी गेली असता त्याने अत्याचार केला व तिला जीवे मारण्याची धमकी दिली. सदरची घटना घडूनही भीतीपोटी पीडित मुलीने ही घटना कोणाला सांगितली नाही. मात्र त्रास होऊ  लागल्याने तीने गुरुवार, दि २३ रोजी ही घटना आपल्या आईस सांगितली. त्यामुळे  आईने जामखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या वरून सदर आरोपी विरोधात गुरुवार, दि २३ रोजी रात्री उशिरा अत्याचार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा गुन्हा दाखल होत असताना आरोपीच्या संबंधित नातेवाइकांनी पीडित मुलीच्या आईवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्या दबावाला बळी न पडता पीडित मुलीच्या आईने फिर्याद दाखल केली. सदरचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी सचिन शालन पवार यास राहत्या घरातून ताब्यात घेऊ न अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अवतारसिंग चव्हाण हे करत आहेत.