News Flash

संतापजनक! नागपुरहून पुण्याला येणाऱ्या तरुणीवर धावत्या बसमध्ये दोन वेळा बलात्कार

धावत्या बसमधून फेकण्याची दिली होती धमकी

संग्रहित छायाचित्र/इंडियन एक्स्प्रेस

राज्यात महिला अत्याचाराची आणखी एक संतापजनक घटना समोर आली आहे. नागपूरवरून पुण्याला येणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणीवर खासगी बसमध्ये दोन वेळा बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. ६ जानेवारीला रात्री प्रवासादरम्यान ही घटना घडली. चाकूचा धाक दाखवून क्लिनरने तरुणीवर अत्याचार करण्यात आला. त्याचबरोबर अत्याचाराची वाच्यता केल्यास बसमधून फेकून देण्याची धमकी आरोपीनं दिली होती.

५ जानेवारी रोजी पीडित तरुणी नागपूरवरून पुण्याला जाण्यासाठी निघाली होती. तरुणी खासगी बसमधून प्रवास करत होती. बसमध्ये चढल्यानंतर तिला बराच वेळ सीट मिळालं नाही. काही वेळानंतर तिला क्लिनरने बसच्या पाठीमागच्या सीटवर बसण्यास सांगितलं. बस सुरू झाल्यानंतर क्लिअनरने तिला चाकूचा धाक दाखवला आणि दोन वेळा तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर या घटनेबद्दल वाच्यता केल्यास चालत्या बसमधून फेकून देण्याची धमकीही दिली.

आणखी वाचा- मुंबईतील थरारक घटना! भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी तिने टाकलं हनी ट्रॅप, पण… ऐनवेळी डाव फिस्कटला

बस पुण्यात दाखल झाल्यानंतर तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पीडित तरुणी मूळची गोंदिया जिल्ह्यातील असून, ती पुणे जिल्ह्यातील कारेगाव येथील एका खासगी कंपनीत कामाला आहे. पीडितेनं पुण्याजवळील रांजणगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली होती. पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला. खासगी बस वाशिम जिल्ह्यातील मालेगाव परिसरात असताना ही घटना घडलेली असल्यानं गुन्हा मालेगाव पोलिसांकडे वर्ग केला. या प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहेत.

तरुणीवर बलात्कार करणारा आरोपी फरार आहे. ज्या बसमध्ये ही अत्याचाराची घटना घडली, ती बस मालेगाव पोलिसांनी पुण्यातून जप्त केली आहे. त्याचबरोबर आरोपी क्लिनरला अटक करण्यासाठी पोलिसांचं एक पथक नागपूरला पाठवण्यात आलं आहे. दरम्यान, पीडित तरुणीला वैद्यकीय चाचणीनंतर घरी पाठवण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2021 8:00 am

Web Title: crime news rape crime washim private luxury bus girl rape accused absconding police search bmh 90
Next Stories
1 मंत्री जयंत पाटील यांच्या कारखान्याच्या कार्यालयास आग
2 परळीच्या औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राला प्रदूषण महामंडळाची नोटीस
3 मालेगावमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीची भाजपशी युती
Just Now!
X