पाथरी येथील नेताजी सुभाष विद्यालयाचा मुख्याध्यापक भगवान दामाजी डोंगरे व सहशिक्षक ज्ञानोबा शंकर कहाळ यांच्या विरोधात शाळेतील शिक्षकांकडून ५० हजारांची लाच मागितल्याबाबत पाथरी पोलिसात गुन्हा दाखल झाला.
या विद्यालयात सहशिक्षकाने आपल्याला लाचेची मागणी केली जात असल्याची तक्रार दिली होती. मुख्याध्यापक डोंगरे व सहशिक्षक कहार यांनी त्यांना नोकरी करताना कोणताही त्रास न देण्यासाठी, तसेच शिक्षक हजेरीपटावर सह्या करू देण्यासाठी ५० हजार रुपये लाचेची मागणी केली. या प्रकरणी संबंधित सहशिक्षकाने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यावरून विभागाने लावलेल्या सापळ्यात मुख्याध्यापक व सहशिक्षकाने ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. मुख्याध्यापक डोंगरेने सहशिक्षक कहारकडे लाचेची रक्कम देण्यास सांगितल्याचे स्पष्ट झाले. लाचेची रक्कम स्वीकारताना पकडण्यासाठी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावला. परंतु सहशिक्षकास संशय आल्याने त्याने लाचेची रक्कम स्वीकारली नाही. त्यामुळे अखेर लाचेची मागणी केल्याबाबत मुख्याध्यापक डोंगरे व सहशिक्षक कहार या दोघांवर पाथरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.