07 December 2019

News Flash

नराधम बापाकडून मुलीवर अत्याचार

लहान मुलीच्या हत्येची शिक्षा भोगली

संग्रहित छायाचित्र

लहान मुलीच्या हत्येची शिक्षा भोगली

अकोला : लहान मुलीच्या हत्याप्रकरणी सात वर्षांचा कारावास भोगून आलेल्या नराधम बापाने आपल्याच १५ वर्षांच्या सख्ख्या मुलीवर सातत्याने शारीरिक अत्याचार केल्याचा धक्कादायक आणि नात्याला काळिमा फासणारा प्रकार वाशीम जिल्हय़ात उघडकीस आला. या प्रकाराची पीडित मुलीने वाशीम ग्रामीण पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीवरून आरोपी बापाविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

वाशीम तालुक्यातील रहिवासी १५ वर्षीय पीडित मुलीच्या आईचे तिच्या लहानपणीच निधन झाले होते. बापाने सख्ख्या लहान मुलीची हत्या केल्याच्या गुन्ह्यत तो सात वर्षे अमरावती व वाशीमच्या कारागृहात बंदिस्त होता. या दरम्यान पीडित मुलगी आजोबा व आजी यांच्याजवळ राहत होती. दोन महिन्यापूर्वी पीडितेचा बाप हा कारागृहातून सुटला. एक महिना पुणे येथे मजुरीचे काम करून तो महिन्याभरापूर्वी घरी परतला. तेव्हापासून पीडित मुलगी त्याच्याजवळ राहत होती. नराधम बापाने आपल्याच सख्ख्या मुलीवर जबरदस्ती करून अत्याचार केला. अनेकवेळा तिला विशिष्ट प्रकारच्या गोळ्या प्राशन करण्यास भाग पाडले. रविवारी रात्री तो पीडित मुलीला दुचाकीवर बसवून आत्याच्या घरी नेण्याच्या बहाण्याने घेऊन जात असताना आजी-आजोबांसह काका आदींनी त्यास प्रतिकार करून मुलीची सुटका केली. याप्रकरणी पीडित मुलीने वाशीम ग्रामीण पोलिसांत बापाविरुद्ध तक्रार दाखल केली.

First Published on July 24, 2019 2:23 am

Web Title: criminal man rape daughter in washim district zws 70
Just Now!
X