सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला धोका उत्पन्न करणारे नितीन ऊर्फ आबा महादेव स्वामी यास एक वष्रे तर कुमार नायकु आलासे याला या गुन्हेगारास दोन वर्षांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आली असल्याची माहिती बुधवारी पोलीस प्रशासनाने पत्रकाद्वारे दिली आहे.
सार्वजनिक स्वास्थ्य, सुव्यवस्था व शांता बाधित करण्यास कारणीभूत ठरणाऱ्या गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाईचे नियोजन करण्याचे निर्देश जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. त्यानुसार या प्रस्तावाचा प्राधान्याने निपटारा करण्याबाबत जिल्हधिकाऱ्यांनीही सूचित केले होते, त्यानुसार कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील कुख्यात गुन्हेगार कुमार आलासे (रा. गोठणपूर तालुका) शिरोळ व इचलकरंजी शिवाजीनगर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील कुख्यात गुन्हेगार नितीन ऊर्फ आबा महादेव स्वामी (रा. कबनूर) या दोघांविरोधात हद्दपारीचे प्रस्ताव इचलकरंजीतील प्रांताधिकाऱ्यांनी बनविला होता. या दोघा समाजकंटकाविरुद्ध अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. प्रस्तावाची दखल घेऊन दोघा गुंडांविरोधात उपरोक्तप्रमाणे हद्दपारीचा निर्णय घेण्यात आला आहे.