News Flash

इयत्ता १२ वीची परीक्षा रद्द करावी

करोना महामारीचे संकट प्रचंड मोठय़ा प्रमाणात वाढत असतांना विद्यार्थी या आजाराने बाधित होण्याचे प्रमाणही वाढले आहे.

संग्रहित छायाचित्र

जिल्हा मुख्याध्यापक संघाची मागणी

नाशिक : करोना महामारीचे संकट प्रचंड मोठय़ा प्रमाणात वाढत असतांना विद्यार्थी या आजाराने बाधित होण्याचे प्रमाणही वाढले आहे. अशा परिस्थितीत इयत्ता १२ वीची परीक्षा घेणे योग्य ठरणार नाही. या प्रतिकू ल वातावरणात परीक्षा देण्याबाबत विद्याथी, पालक, शिक्षक अशी सर्वच यंत्रणा अस्वस्थ आहे. याचा विचार करुन १२ वीची परीक्षा रद्द करण्यात यावी, अशी मागणी नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने करण्यात आली आहे.

जिल्हा तसेच राज्यात करोनाचा संसर्ग वेगाने फैलावत आहेत. करोनाग्रस्त रुग्णांमध्ये युवा वर्गाचे प्रमाण लक्षणीय आहे. अशा धोकादायक वातावरणात परीक्षा घेणे कितपत योग्य ठरेल, याविषयी धास्तावलेले पालक मुख्याध्यापकांना दूरध्वनीवरून सातत्याने विचारणा करत आहेत.

समाज माध्यमातून आपली नाराजी व्यक्त करत आहेत. परीक्षा घ्यायच्याच असतील तर १२ वी परीक्षार्थी विद्यार्थ्यांंना १०० टक्के  लसीकरण करावे, त्यांना विमा कवच द्यावे, सर्व वैद्यकीय सुविधा पुरवाव्यात, सोबत परीक्षा संचालनालयात काम करणाऱ्या यंत्रणेचे लसीकरण करून विमा कवच द्यावे, अशी मागणी

नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत शिक्षण मंत्र्यांना निवेदन देण्यात आले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2021 1:26 am

Web Title: crisis corona epidemic intensifies so does the incidence of the disease among students ssh 93
Next Stories
1 करोना संकटात २५ वर्षांपूर्वीच्या वर्गमित्रांची मदत
2 सूक्ष्म नियोजनामुळेच पंढरपूरमध्ये कमळ फुलले
3 प्रयत्नांती यश-अपयश
Just Now!
X