News Flash

विखे यांचे ठाकरे यांना प्रत्युत्तर

शेतकऱ्यांना मदत करणे हा काँग्रेसचा कार्यक्रम आहे. अडचणीच्या काळात समाजातील प्रत्येक घटकाला मदतीचा हात पुढे करणे हे खरे महाराष्ट्राचे मॉडेल (प्रारूप) आहे अशा शब्दात केंद्र

| April 14, 2014 02:10 am

शेतकऱ्यांना मदत करणे हा काँग्रेसचा कार्यक्रम आहे. अडचणीच्या काळात समाजातील प्रत्येक घटकाला मदतीचा हात पुढे करणे हे खरे महाराष्ट्राचे मॉडेल (प्रारूप) आहे अशा शब्दात केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्णयांचा लेखाजोखा मांडतानाच तुम्ही काय विखे पिता-पुत्रांना ठेचता. या निवडणुकीत तुमच्या उमेदवारालाच मतदार ठेचतील अशी टीका कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्यावर केली.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारासाठी अस्तगाव आणि एकरुखे येथील जाहीर सभेत विखे बोलत होते. अध्यक्षस्थानी गणेश कारखान्याचे माजी अध्यक्ष भागवतराव गोर्डे होते. राष्ट्रवादीचे नेते व गणेशचे अध्यक्ष अ‍ॅड. नारायण कार्ले,बाळासाहेब गायकवाड, विनायकराव निकाळे, सभापती निवास त्रिभूवन, उपसभापती सुभाष विखे,बाजार समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब कडू, सरपंच केशवराव चोळके आदी उपस्थित होते.
विखे म्हणाले, त्यांनी बाळासाहेब ठाकरेंना उपाशी ठेवले असे राज ठाकरे म्हणतात. त्यांच्या मालमत्तेवरुन घरात भांडणे सुरु आहेत. ते आमच्यावर टीका करतात, ठेचण्याची भाषा करतात. मात्र शिवसेनेला अनेकांनी रामराम ठोकला. सेनेला आता घरघर लागली आहे. बाबर, नार्वेकर असे अनेक नेते पक्षाला सोडून गेले. त्यावर पक्षाची स्थित काय होती ते पहा. चार वेळा निवडून आलेल्या खासदारांकडून पैसे मागणे योग्य आहे का असा खोचक सवालही त्यांनी केला.
विरोधी उमेदवार या मतदारसंघातील नाही. त्याची आपल्याशी बांधिलकी नाही त्यांना मतदान करणार की काँग्रेसचे भाऊसाहेब वाकचौरे यांना असा सवाल विखे यांनी केला. ते म्हणाले, वाकचौरे यांनी या मतदारसंघाचे प्रश्न लोकसभेत मांडले. त्यांची या मतदारसंघाशी बांधिलकी आहे. त्यांनाच विजयी करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2014 2:10 am

Web Title: criticism on uddhav thakare by radhakrishna vikhe
Next Stories
1 राज्यभरातून आघाडीचे उमेदवार बहुमताने निवडून इतिहासाची पुनरावृत्ती करा- अजित पवार
2 राणेंची कोंडी कायम
3 कॉम्रेड शरद पाटील यांना अखेरचा ‘लाल सलाम
Just Now!
X