आतापर्यंत केवळ दोन लाख शेतकऱ्यांना कर्जवाटप

संजय बापट लोकसत्ता

मुंबई:  आजवर मोठय़ा बागायदार शेतकऱ्यांनाच कर्ज देऊन सरकारी उद्दीष्ट पूर्ण करण्याचे सोपस्कार पूर्ण करणाऱ्या व्यापारी बँकाची यंदा राज्य सरकाच्या एका निर्णयामुळे चांगलीच कोंडी झाली आहे. त्यामुळे करोनाचे कारण पुढे करीत या बँकानी शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यास नकारघंटा लावली आहे. परिणामी शेतीला हंगाम सुरू झाल्यानंतरही व्यापारी बँकाकडून मे अखेर जेमतेम दोन लाख तर जूनच्या पहिल्या पंधरवडय़ापर्यंत अडीच ते तीन लाख शेतकऱ्यांनाच कर्ज मिळाल्याची बाब समोर आली आहे. याउलट जिल्हा मध्यवर्ती बँकानी नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांना मदत करताना सरकारने ठरवून दिलेल्या उद्दीष्टाच्या ६६ टक्के  कर्जवितरण के ले आहे. व्यापारी बँकाच्या या नाकर्तेपणाची राज्य सरकारनेही गंभीर दखल घेतली आहे.

Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
ed claims in court arvind kejriwal key conspirator in liquor policy
केजरीवालच मुख्य सूत्रधार; मद्य धोरण गैरव्यवहारप्रकरणी ‘ईडी’चा न्यायालयात दावा; सहा दिवसांची कोठडी
ST Bank in trouble Suspension of loan provision to members
‘एसटी बँक’ अडचणीत! सभासदांच्या कर्ज पुरवठ्याला स्थगिती, कारण काय? वाचा…

राज्यात गेल्यावर्षी खरीप आणि रब्बी हंगामासाठी ६२ हजार ४५९ कोटी रूपयांच्या शेतीकर्ज वाटपाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी व्यापारी आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकानी मिळून उद्दीष्टाच्या ७७ टक्के  म्हणजेच ४७ हजार ९७२ कोटी रूपयांचे पीक कर्जवाटप के ले होते. त्यामध्ये व्यापारी बँकानी उद्दीष्टाच्या६७ टक्के  तर जिल्हा बँकानी ९७ टक्के  पीक कर्जवाटप के ले होते. मात्र या कर्जवाटपात राष्ट्रीयकृत आणि खाजगी बँकानी छोटय़ा शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप करण्यात अखडता हात घेतला होता. एवढेच नव्हे तर मोठय़ा शेतकऱ्यांना अधिक कर्ज देऊन उद्दीष्ट गाठण्याचा देखावा करीत सरकारच्या डोळ्यात धुळफे क करण्याचा प्रयत्न के ला होता. राज्यातील बहुतांश छोटय़ा शेतकऱ्यांना काही हजार किवा फार फार तर दीड दोन लाखापर्यंतचे कर्ज लागते आणि एवढे छोटे कर्ज देण्यास बँका फारशा उत्सुक नसतात. त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव कर्जासाठी सावकारांकडे जावे लागत असल्याची गंभीर बँक ऑफ महाराष्ट्र या लीड बँकेने काही महिन्यांपूर्वी सरकारच्या निदर्शनास आणली होती. त्याची दखल घेत राज्य सरकार आणि नाबार्डने यंदा प्रथमच जिल्हा मध्यवर्ती तसेच व्यापारी बँकाना पीक कर्ज वाटप करताना शेतकऱ्यांचे उद्दीष्ठ दिले आहे.  यंदाच्या खरीप हंगामासाठी ७९ हजार १९० कोटी  रूपयांच्या पीककर्ज वितरणाचे उद्दीष्ठ राज्यातील बँकाना देण्यात आले आहे. त्यामध्ये राष्ट्रीयकृत बँकाना २७ लाख ५७ हजार शेतकऱ्यांना १९ हजार ८८० कोटी रूपयांचे उद्दीष्ठ देण्यात आले असून मे अखेर या बँकानी एक लाख ६६ हजार शेतकऱ्यांना दोन हजार ५६ कोटी रूपयांचे पीक कर्ज वितरीत के ले आहे. तर खाजगी बँकानी चार हजार २२८ कोटीच्या उद्दीष्ठापैकी १९ हजार ६७४ शेतकऱ्यांना ४४३ कोटी रूपयांचे कर्ज दिले आहे. ३१ जिल्हा मध्यवर्ती बँकानी राज्य सहकारी बँके च्या साह्य़ाने १५ लाख आठ हजार शेतकऱ्यांना  नऊ हजार २१० कोटी रूपयांचे पीककर्ज वाटप के ल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे. गेल्या पंधरा दिवसात जिल्हा बँकाचे कर्जवाटप वाढले असले तरी व्यापारी बँका मात्र करोना, कर्मचाऱ्यांची अनुूपस्थिती अशी कारणे पुढे करून कर्जवाटपात टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी येत असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली.

शेतकरी हवालदिल

व्यापारी बँका कर्ज देत नसल्याने शेतकरी हवालदील झाले असून करोनाचे कारण पुढे करून कर्ज देण्यात टाळाटाळ के ली जात आहे. या शेतकऱ्यांना कर्ज देण्यात बँकाना स्वारस्यच नसल्याचा आरोप किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ.अजित नवले यांनी के ला आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यापारी बँकाच्या या नाकर्तेपणाची गंभीर दखल घेतली असून छोटय़ा शेतकऱ्यांना प्राधान्याने कर्ज वाटप करण्याच्या सूचना बँकाना देण्यात आल्या आहेत. आजवर मोठय़ा शेतकऱ्यांनाच कर्ज  दिले जात होते. त्यामुळेच यंदा प्रत्येक बँके ला शेतकऱ्यांचे उद्दीष्ठ देण्यात आले असून त्यांना ते पूर्ण करावेच लागले असे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.