मोफत तांदुळ वाटप करण्यात येत असल्याच्या गैरसमजातून शिरपूरमधील स्वस्त धान्य दुकान क्रमांक एकसमोर गर्दी झाली. परिणामी सामाजिक अंतराच्या सुचनांना हरताळ फासला गेला.

सरकारने एप्रिल महिन्यात सर्वांना मोफत तांदुळ वाटपाची घोषणा केली आहे. हा तांदुळ स्वस्त धान्य दुकानातून मिळणार असल्याने शिरपूर शहरातील अंबिका नगरातील रेशन दुकानासमोर शासनाने जाहीर केलेला मोफतचा तांदुळ मिळणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर अंबिका नगरसह वैदुवाडा परिसरातील महिलांनी एकाच वेळी प्रचंउ गर्दी केली. यावेळी दुकानदारांनी अजून तांदुळ आलाच नसल्याचे सांगितल्याने लोकांचा संताप झाला. यातून वादाचा प्रसंग निर्माण झाला. परिणामी तहसीलदार आबा महाजन यांनी त्याठिकाणी धाव घेत नागरिकाची समजूत काढली.

अद्याप मोफतचा तांदुळ आला नसल्याची माहिती तहसिलदारांनीच दिल्याने गर्दी कमी झाली.