09 March 2021

News Flash

पत्नी, सासऱ्याची हत्या करून सीआरपीएफच्या जवानाची आत्महत्या

छगन प्रल्हाद जाधव असे आत्महत्या करणाऱ्या जवानाचे नाव आहे

कौटुंबिक वादातून केंद्रीय राखीव पोलीस दलातील (सीआरपीएफ) एका जवानाने सोमवारी स्वतःजवळील बंदुकीतून पत्नी आणि सासऱ्यावर गोळी झाडून त्यांची हत्या केली आणि नंतर स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. छगन प्रल्हाद जाधव (४५) असे आत्महत्या करणाऱ्या जवानाचे नाव आहे. तो छत्तीसगढमध्ये कार्यरत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छगन जाधव दिवाळीच्या सुटीनिमित्त अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील माळराजूरा या आपल्या गावी आला होता. पूर्वीपासूनच त्याच्यात आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद सुरू होता. त्याची पत्नी सुशिला हिने या विरूद्ध न्यायालयात खटलाही दाखल केला होता. सोमवारी सकाळी छगन याचा सासरा मखाराम राठोड (रा. मेडशी, जि. वाशीम) त्याच्या घरी आला होता. यावेळी सासरा, पत्नी आणि छगन यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक वादावादी झाली. त्यातून चिडलेल्या छगनने आपल्याकडील बंदुकीतून पत्नींच्या छातीवर आणि सासऱ्याच्या पोटावर गोळ्या झाडल्या. गोळी लागल्याने ते दोघे जागीच ठार झाले. त्यानंतर त्याने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.
कौटुंबिक वादातून छगन याने गोळीबार केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. याप्रकरणी पुढील तपास करण्यात येतो आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2015 3:57 pm

Web Title: crpf personnel commits suicide after killing his wife and father in law
Next Stories
1 दिवाळी अंकांचे स्वागत..
2 एफआरपी कायद्यातील सुधारणांशिवाय साखर कारखानदारी अवघड- खडसे
3 ‘फ्लेमिंगो’ची सोलापूरकरांना साद
Just Now!
X