News Flash

धुळ्यात रांगा कायम, गर्दीत घट

बोटास शाई लावण्यास सुरुवात झाल्याने गर्दी काही प्रमाणात कमी झाली आहे.

धुळे येथे बँक आणि टपाल कार्यालयांसमोर सलग नवव्या दिवशीही रांगा कायम असल्या तरी नोटा बदलून घेणाऱ्यांच्या बोटास शाई लावण्यास सुरूवात झाल्याने गर्दीत घट झाली आहे.

शहरातील बँकांमध्ये आणि टपाल कार्यालयात नोटा बदलण्यासाठी रांगा लावणाऱ्यांच्या बोटास शाई लावण्यास सुरुवात झाल्याने गर्दी काही प्रमाणात कमी झाली आहे.

जुन्या ५०० आणि हजार रूपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी ३० डिसेंबरपर्यंत मुदत असली तरी नोटा बदलून घेण्यासाठी गर्दी करणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले नव्हते. गरजेपुरतेच पैसे काढण्याचे आवाहन रिझव्‍‌र्हे बँकेने करुनही रांगा कमी होत नव्हत्या. त्यातच काळे पैसे बाळगणाऱ्यांनी सामान्यांना काही टक्क्य़ांचे आमिष दाखवून पैसा सफेद करण्याचा फंडा वापरला. यामुळे बँकासमोरील रांगा कमी होण्याची चिन्हे दिसत नव्हती. त्यावर केंद्र सरकारने नोटा बदलवून घेणाऱ्यांच्या बोटावर शाई लावण्याचा निर्णय घेतल्यामुळे गर्दी कमी होत असल्याचे दिसून येऊ लागले आहे. शहरातील स्टेट बँक, सेंट्रल बँक, एचडीएफसी या बँकांच्या प्रमुख व अन्य शाखांमध्ये बुधवारपासून शाईचा वापर करण्यात आला. तर उर्वरित बँकांनी गुरूवारपासून शाई लावण्यास सुरुवात केली आहे. जनधन खाते व दारिद्र्यरेषेखालील खात्यात ठराविक रकमेपेक्षा अधिक रक्कम जमा झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित कुटुंबाच्या सर्व सवलती काढून घेण्याचा इशारा देण्यात आला आहे. परिणामी बँकासमोरील गर्दी थोडय़ाफार प्रमाणात कमी होत आहे. सध्या धुळे जिल्ह्यत सर्व बँकांचे ६० एटीएम सुरू असून स्टेट बँकेने बुधवारी चार एटीएममधून दोन हजार रुपयांच्या नवीन नोटा उपलब्ध करून दिल्याने दैनंदिन व्यवहारावरही त्याचा परिणाम जाणवू लागला आहे.

मागील आठवडय़ात नागरिकांच्या हातात नवीन चलन लवकर उपलब्ध न झाल्यामुळे जनसामान्यांच्या दैनंदिन व्यवहारावर परिणाम झाला होता. तसेच मालमत्ता, बाजार समित्या, सराफा बाजार या माध्यमातून होणाऱ्या कोटय़वधी रुपयांचा व्यवहारही थंडावला. आता बँका तसेच एटीएमद्वारे सर्वांना नोटा उपलब्ध होऊ  लागल्यामुळे बाजारपेठेत गर्दी वाढत असून व्यवहार पूर्वपदावर येऊ लागले आहेत. शहरातील एटीएममध्ये नवीन नोटांसाठी जोडणी करण्याचे काम वेगात सुरु असून सध्या एटीएममधून केवळ शंभरच्याच नोटा मिळत आहेत. त्यामुळे एटीएम काही तासातच रिकामे होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2016 1:07 am

Web Title: currency shortage in dhule
Next Stories
1 नोटाबंदीमुळे दारूमुक्ती!
2 दानपेटीतील पैशांचा आता दररोज भरणा
3 नोटबंदीमुळे काळू-बाळू तमाशाही अडचणीत
Just Now!
X