News Flash

Coronavirus : महाराष्ट्रातील करोनाचा वेग वाढला; एका दिवसात ५५ जण आढळले संसर्गग्रस्त

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

संग्रहीत

जगभरात थैमान घालणाऱ्या करोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढतच आहे. महाराष्ट्र यामध्ये अव्वल स्थानावर आहे. सद्यस्थितीस महाराष्ट्रात 690 जणांना करोनाची बाधा झालेली आहे.  राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे.

मुंबई – 29, पुणे – 17, पिंपरी-चिंचवड – 4, अहमदनगर – 3, औरंगाबाद – 2 असे 55 नवे करोनाचे पॉझिटिव्ह रूग्ण राज्यभरात आढळले आहेत. आजच्या तारखेपर्यंत 56 जणांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलेले आहे, असेही टोपे यांनी सांगितले आहे.

मुंबई, पुण्यापाठोपाठ मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरातही करोनानं हातपाय पसरण्यास सुरु केलं आहे. शहरात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असताना रविवारी एका ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

तर, कोरोनावर मात आणि अर्थव्यवस्था रुळावर आणणं ही दोनच आजच्या घडीला राज्यासमोरची प्रमुख आव्हानं आहेत. नागरिकांनी आणखी काही दिवस घरातच थांबून कोरोनाचा प्रसार रोखला तर या आव्हानांवर आपण लवकरात लवकर मात करु शकू, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2020 3:52 pm

Web Title: current count of covid19 patients in maharashtra is 690 rajesh tope msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 औरंगाबादमध्ये करोनाचा पहिला बळी; घाटीत उपचार सुरू असलेल्या व्यक्तीचा मृत्यू
2 Coronavirus : “महाराष्ट्रासमोर सध्या दोनच आव्हानं, जनतेच्या सहकार्यानं मात करणार”
3 Coronavirus: मरकजहून नवी मुंबईत आलेल्या १० परदेशी नागरिकांविरोधात गुन्हा
Just Now!
X