रोजगारासाठी डोंगराळ पट्टय़ातून मोठे स्थलांतर

डोंगराळ भागातील हक्काचे फळपीक म्हणून प्रसिद्ध असलेल्या सीताफळाला यंदा दुष्काळाचा मोठा फटका बसला आहे. बालाघाटच्या डोंगरावर बहरणाऱ्या सीताफळाच्या बागाच सततच्या अवर्षणामुळे संकटात सापडल्यामुळे परभणी जिल्ह्य़ात बाजारपेठेत यंदा सीताफळ दाखल झालेच नाही. परिणामी सीताफळ विक्री करून जोडधंदा करणाऱ्या अनेकांच्या रोजगारावरही गंडांतर आले. उन्हाळ्यात शेतातील कामे नसतानाही सीताफळामुळे गावातच रोजगार मिळायचा, पण आता हा हंगाम संकटात सापडल्याने डोंगराळ टापूतून रोजगारासाठी मोठे स्थलांतर होत आहे.

गंगाखेड तालुक्यातील डोंगराळ पट्टय़ात दरवर्षी हिवाळ्यात सीताफळाच्या बागा बहरतात. डोंगरपट्टय़ात कमी पावसात येणारे फळपीक म्हणून सीताफळाकडे पाहिले जाते. भरपूर पाणी नसतानाही केवळ नसíगक पावसावरच सीताफळाचे पीक येते, मात्र गेल्या ३ वर्षांपासून दुष्काळ पडत असल्याने यंदा सीताफळाचे पीक आलेच नाही. गंगाखेड तालुक्यातील कोद्री, वडवणी, िपपळदरी, सुप्पा, वाघदरी, अंतरवेली अशा अनेक गावांसह डोंगरी पट्टय़ातल्या गावांमध्ये बरेच जण या दिवसांत सीताफळाचा जोडधंदा करतात.

गंगाखेडच्या बालाघाट परिसरात येणारे हे फळपीक आसपासच्या तालुक्यांपर्यंत विक्रीसाठी जाते. परभणी शहरातही सीताफळाच्या डाला घेऊन शेतकरी मोठय़ा संख्येने येतात. या वर्षी मात्र सीताफळाचा हंगाम संपत आला, तरीही बाजारात आवक नाही अशी परिस्थिती आहे. नोव्हेंबरपासून बाजारात सीताफळाची आवक पुढील दोन महिने होते.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने गेल्याच वर्षी ‘धारूर ६५’ हे सीताफळाचे संशोधित वाण तयार केले. गतवर्षी हे वाण तयार केल्यानंतर लागोपाठ दोन्ही वष्रे मराठवाडय़ात दुष्काळी स्थिती निर्माण झाली. विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ.अशोक ढवण यांनी,‘सीताफळ, डाळिंब, बोर या पिकांच्या माध्यमातून शेतकरी कमी पाण्यातही चांगले उत्पन्न घेऊ शकतात,’ असे सांगितले. यंदा दुष्काळाने सीताफळावरही परिणाम झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गाव सोडणे अपरिहार्य

डोंगराळ पट्टय़ात हाताला रोजगार नसताना सीताफळ विक्रीतून काही कमाई केली जाते. संपूर्ण सीताफळाचा हंगाम या व्यवसायातील सर्वानाच पसे मिळवून देतो. या वेळी सीताफळच न आल्याने रोजगाराचाही प्रश्न मोठय़ा प्रमाणावर तयार झाला. उन्हाळ्याच्या दिवसांत शेतातली बाकीची कामे बंद असतात. मात्र, सीताफळाचा हंगाम जोरात असतो. यंदा हा हंगामच संपुष्टात आल्याने रोजगारासाठी गाव सोडणे अपरिहार्य झाले आहे.