News Flash

कोल्हापूर स्फोटातील आरोपींना कोठडी

व्यवसायासाठी घेतलेली भांडवलाची उसनी रक्कम परत मागू नये यासाठी भीती घालण्याच्या उद्देशाने उजळाईवाडी येथे बॉम्बस्फोट घडविण्याचा प्रकार करणाऱ्या तिघा आरोपींना अटक केल्याचे मंगळवारी पोलिसांनी

| September 4, 2014 02:35 am

व्यवसायासाठी घेतलेली भांडवलाची उसनी रक्कम परत मागू नये यासाठी भीती घालण्याच्या उद्देशाने उजळाईवाडी येथे बॉम्बस्फोट घडविण्याचा प्रकार करणाऱ्या तिघा आरोपींना अटक केल्याचे  मंगळवारी पोलिसांनी उघडकीस आणले. या प्रकरणी अविनाश बाबुराव बन (वय ३३ रा. उजळाईवाडी), ज्योती उर्फ प्रीती राजाराम पवार (वय १९ रा. भीमनगर पेठ ता. वाळवा) यांना अटक करण्यात आली असून अभय नितीन परीक (रा. शाहुपुरी) या फरारी आरोपीचा शोध सुरू आहे.
२३ ऑगस्ट रोजी सायंकाळी शाहू टोलनाका येथे श्रीधर मारुती खुटाळे (रा. उजळाईवाडी ता. करवीर) याच्या ‘स्टार चिकन ६५’ नावाच्या गाडय़ावर बॉम्बस्फोट घडला होता. यामध्ये मनोज परब व श्रीधर खुटाळे हे दोघेजण जखमी झाले होते. हा बॉम्बस्फोट कसा झाला असावा याचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नियुक्त केले होते. या पथकास अविनाश बन याचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना समजली. बन हा पुणे येथे असल्याचे समजल्यावर पथकाने तेथे जाऊन त्याला ताब्यात घेतले. त्याला कोल्हापुरात आणल्यानंतर विश्वासात घेऊन तपास केला असता त्याने हा प्रकार अभय परीक व ज्योती पवार यांच्या सहकार्याने केल्याचे कबुल केले.
गुन्हा करण्यामागचे कारण काय याची विचारपूस केली असता बन याने पोलिसांना सांगितले की, त्याने मोबाईल सिमकार्ड रिचार्ज व्यवसाय भागीदारीत चालविण्यासाठी खुटाळे याच्याकडून चार-पाच वर्षांपूर्वी अडीच लाख रुपये भांडवल स्वरुपात घेतले होते. दोन वर्ष व्यवसाय चालल्यानंतर तो नुकसानीत आल्याने बंद केला. खुटाळे याने भांडवलाची रक्कम परत मागितल्यावर ९० हजार रुपये परत केले. आíथक परिस्थिती बिघडल्याने उर्वरित रक्कम देता येत नव्हती. तर दुसरीकडे खुटाळेने पशासाठी तगादा लावला होता. त्यामुळे बन त्याचा मित्र परीक व त्यांची मत्रिण ज्योती याने खुटाळे याने पसे मागू नयेत या विचाराने त्यास भीती दाखवण्याच्या हेतूने बॉम्ब तयार करण्याचे ठरविले. तिघांनी २२ ऑगस्ट रोजी बॉम्ब तयार केला. बन याने खुटाळे यास ज्योती हिच्याकरवी वैभव सोसायटीतील पाण्याच्या टाकीजवळ बोलावून घेऊन तेथे बॉम्बचा स्फोट करून त्याला भीती दाखविण्याचे ठरविले. बन याच्या सांगण्यावरून ज्योतीने खुटाळे यास फोन करून आपले दोघांचे असभ्य स्वरूपातील फोटो काढलेले आहेत ते दाखवण्यासाठी बोलावून घेण्याचा प्रयत्न केला. पण खुटाळे तिकडे फिरकला नाही. त्यामुळे तो बॉम्ब रात्री उशिरा खुटाळे याच्या गाडय़ावर ठेवून बन, परीक व ज्योती तिघे पुण्याला निघून गेले. तर २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता बॉम्बचा स्फोट झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2014 2:35 am

Web Title: custody in kolhapur blast accused
टॅग : Blast,Kolhapur
Next Stories
1 सेवेत हलगर्जीपणा करणारे ४३ कर्मचारी थेट बडतर्फ
2 हद्दवाढीस स्थगिती दिल्याने करवीरकर नाराज
3 वारणेचा साठा १०० टक्क्य़ांवर तर कोयनेचा १०० टीएमसीवर
Just Now!
X