News Flash

सायकलपटू हर्षद पूर्णपात्रे यांचा मृत्यू

मनाली-लेह दरम्यान सायकलिंग करताना येथील व्यावसायिक हर्षद पूर्णपात्रे (३९) यांचा प्राणवायुचे प्रमाण कमी होऊन हृदय बंद पडल्याने मृत्यू झाला

| August 2, 2015 03:58 am

मनाली-लेह दरम्यान सायकलिंग करताना येथील व्यावसायिक हर्षद पूर्णपात्रे (३९) यांचा प्राणवायुचे प्रमाण कमी होऊन हृदय बंद पडल्याने मृत्यू झाला. आधाराश्रमाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीकांत पूर्णपात्रे यांचे ते ज्येष्ठ चिरंजीव होत.
सायकलिंगचा छंद असणाऱ्या हर्षद यांनी देशभरात अनेक लांब पल्ल्याचे दौरे केले आहेत. मागील सोमवारी ते लेह-लडाख भागात काही सहकाऱ्यांसमवेत सायकलिंगसाठी गेले होते. मनाली येथून या गटाने लेहच्या दिशेने सायकलिंगला सुरूवात केली. उंचावर हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यामुळे पूर्णपात्रे यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. यामुळे त्यांना वाहनात बसविण्यात आले. परंतु, उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात वडील, आई, पत्नी, मुलगी व भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, हर्षद यांनी सायकलद्वारे आजतागायत सुमारे ५० हजार किलोमीटरचे अंतर पार केले. मुंबई ते कन्याकुमारी, दिल्ली ते मुंबई आदी लांब पल्ल्याच्या मोहिमांमध्येही त्यांनी सहभाग नोंदविला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2015 3:58 am

Web Title: cycle rider harshad purnapatre no more
Next Stories
1 सांगली महापालिका ‘स्मार्ट सिटी’ योजनेत नापास
2 अंशत: एलबीटीमुळे मनपाला पुढची भ्रांत
3 कृत्रिम पावसाची प्रतिक्षा संपली!
Just Now!
X