वेधशाळेच्या सुधारीत अंदाजानुसार अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली असून दुपारी त्याचे रूपांतर चक्रीवादळात होईल. दरम्यान, हे ‘निसर्ग’ चक्रीवादळ अलिबागच्या दिशेने सरकत आहे. सुरवातीला हे वादळ हरिहरेश्वर जवळ धडकण्याची शक्यता होती. मात्र, संध्याकाळपर्यंत यात बदल होऊन ते अलिबागच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी वेधशाळेच्या हवाल्याने याबाबत माहिती दिली आहे.

Men travel in womens coaches Safety of women passengers of air-conditioned local at risk
मुंबई : महिला डब्यातून पुरुषांचा प्रवास, वातानुकूलित लोकलच्या महिला प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर
mumbai, Santacruz Chembur Expressway Widening, Amar Mahal Santacruz Elevated Road, Completion Pushed to July, delay in bridge construction, santacruz bridge construction, santacruz chembur road, mumbai road, mumbai bridge
अतिवेगवान प्रवासासाठी जुलैपर्यंत प्रतीक्षा, सांताक्रूझ चेंबूर जोडरस्ता विस्तारीकरण प्रकल्प लांबणीवर
in nagpur Suicide attempt by young man due to family reasons police save him
कौटुंबिक कारणातून युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न, पण देवदुतासारखे धावून आले पोलीस; दरवाजा तोडून…
Rahu And Shukra Conjunction
होळीनंतर राहू-शुक्रची होणार युती! या राशीच्या लोकांच्या आयुष्यात येईल आनंद, धनलाभासह मिळेल नव्या नोकरीची संधी

जिल्हाधिकारी चौधरी म्हणाल्या, “चक्रीवादळ १ जूनला येण्याची शक्यता आयएमडीकडून वर्तवण्यात आली होती. वेधशाळेने यापूर्वी श्रीवर्धनच्या हरिहरेश्वर येथे हे चक्रीवादळ धडकणार असल्याची शक्यता वर्तवली होती. मात्र, आता त्याची दिशा बदलल्याने ते अलिबागच्या किनाऱ्यावर धडकणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.”

“शासनाकडून आत्तापर्यंत रायगड जिल्ह्यासाठी एनडीआरएफच्या दोन तुकड्या पाठवण्यात आल्या आहेत. ज्या अलिबाग आणि श्रीवर्धन तालुक्यांमध्ये आज तैनात आहेत. दरम्यान, आम्ही शासनाकडे अलिबागसाठी अतिरिक्त दोन एनडीआरएफच्या टीम पाठवण्यात याव्यात अशी विनंती केली होती. त्याला मान्यता मिळाली अूसन त्यानुसार या टीम पाठवण्यात येणार आहेत. त्यामुळे आता अलिबागमध्ये एकूण तीन एनडीआरएफच्या टीम काम करणार आहेत,” असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

“त्याशिवाय, या चक्रीवादळाशी सामना करण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. माझे अलिबागवासियांना विशेष आवाहन आहे की, जर तुम्ही कच्च्या घरांमध्ये राहत असाल तर प्रशासनाच्या निर्देशांनुसार, तुम्ही जवळच्या चक्रीवादळ केंद्रामध्ये स्थलांतरित व्हावं. यामुळे चक्रीवादळामुळे होणारी कोणत्याही प्रकारची जीवितहानी प्रशासनाला थांबवता येईल”, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

दरम्यान, स्कायमेट या खासगी वेधशाळेच्या अंदाजानुसार, या चक्रीवादळामुळे पालघरमध्ये बुधवारी, ३ जून रोजी दरड कोसळण्याची शक्यताही वर्तवली आहे.