20 March 2019

News Flash

डीएसकेंच्या तीन नातेवाईकांना आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक

डी. एस. कुलकर्णींना आणखी एक झटका

लोणावळ्याच्या भुशी धरणात बुडून तरुणाचा मृत्यू झाला तर दुसऱ्या घटनेत तुंग किल्ल्यावर ट्रेंकिंग करत असताना सोळा वर्षीय मुलीचा खाली पडून मृत्यू झाला आहे.

गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डी. एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी हे मागील दोन महिन्यापासून अटकेत असून त्यांच्या अटकेनंतर डीएसकेच्या तीन नातेवाईकांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. सई वांजपे, केदार वांजपे आणि धनंजय पाचपोर अशी या तिघांची नावे असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डीएसके आणि त्यांच्या पत्नी हेमंती गुंतवणूक दाराच्या फसवणूक प्रकरणी मागील काही महिन्यापासून अटकेत आहेत. त्यांना जामीन मिळावा, यासाठी न्यायालयात अनेकदा अर्ज देखील करण्यात आला.मात्र प्रत्येक वेळी न्यायलायाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. या सर्व घडामोडी घडत असताना मागील आठवड्यात राज्य शासनाने त्यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले. त्यानंतर गुंतवणूकदारांना या जप्तीमधून पैसे मिळतील.या विषयी अपेक्षा वाढल्या.आता त्याच दरम्यान डीएसकेच्या जवळील सई वांजपे, केदार वांजपे आणि धनंजय पाचपोर यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.हा डीएसकेसाठी मोठा धक्काच आहे यात शंकाच नाही.

First Published on May 16, 2018 8:37 pm

Web Title: d s kulkarni s relatives are arrested by police