सिंधी समाजाचे धार्मिक गुरु म्हणून ओळख असणारे आध्यात्मिक गुरु दादा वासवानी यांचं निधन झालं आहे. मानवता, शांतता आणि शाकाहारचे संदेश देणारे दादा वासवानी यांचं अल्पशा आजाराने निधन झालं. सकाळी नऊ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ९९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दादा वासवानी साधू वासवानी मिशनचे प्रमुख होते. अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव साधू वासनानी मिशनमध्ये ठेवण्यात आलं आहे.

दादा वासवानी यांचा जन्म पाकिस्तानात सिंध प्रांतातील हैद्राबाद येथे 2 ऑगस्ट 1918 रोजी झाला. त्यांच्या आईचे नाव कृष्णादेवी तर वडिलांचे नाव पेहेलाजराय. दादा वासवानी यांचे प्राथमिक शिक्षण हैद्राबाद येथे टी सी प्रायमरी शाळेत झाले होते.

दादा वासवानी हे त्यांचे आध्यात्मिक गुरु साधू वासवानी यांनी स्थापन केलेल्या साधू वासवानी मिशनचे प्रमुख होते. त्यांच्यावर मागील तीन आठवड्यापासून रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरु होते.