News Flash

डहाणूचे मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांचं निधन

ते त्यांच्या घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत सापडले होते

अतुल पिंपळे (फोटो सौजन्य: facebook/agp.atul वरुन साभार)

डहाणू नगर परिषदेचे मुख्याधिकारी अतुल पिंपळे (४१) यांचे मुंबई येथील एका रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवार (२९ मार्च) रोजी सकाळी १० वाजता निधन पावले. त्याच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे.

डहाणू नगर परिषद येथे दुसऱ्यांदा मुख्याधिकारी पदाचा पदभार ते सांभाळत होते. करोना काळात डहाणू नगर परिषदेच्या क्षेत्रात त्यांनी चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळली होती. पिंपळे हे चांगल्या कारभाराबरोबरच प्रशासनावर वचक निर्माण करणारे अधिकारी म्हणून ओळखले जात होते.

२६ मार्च रोजी सकाळी पिंपळे त्यांच्या डहाणू मल्याण येथील घरात रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यानंतर त्यांना डहाणू व्हेस्टकोस रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर मिरारोड येथील भक्ती वेदांत रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. प्रकृती खालावल्याने तसेच डायलेसिस करण्यासाठी सोमवारी त्यांना हिंदूजा रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारादरम्यान आज सकाळी १० वाजता त्यांचे निधन झाले.

पालघर तालुक्यातील मासवण या त्यांच्या मुळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2021 11:36 am

Web Title: dahanu ceo atul pimple died during treatment in mumbai hinduja hospital scsg 91
Next Stories
1 नालासोपाऱ्यात बॅगमध्ये सापडला अज्ञात महिलेचा मृतदेह
2 शरद पवार यांच्यावर बुधवारी ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया
3 मोखाडा : घराला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू
Just Now!
X