News Flash

डहाणूतील आदिवासींचे रोजगारासाठी स्थलांतर

पावसाळ्यात रानभाज्या विकून आणि शेतात मजुरीवर काबाडकष्ट करून कुटुंबाचे संगोपन करतात.

(संग्रहित छायाचित्र)

नितीन बोंबाडे, डहाणू

डहाणू तालुक्यातील अनेक गावांतील आदिवासींनी रोजगारासाठी शहरी भागांत स्थलांतर सुरू केले आहे. त्यामुळे तालुक्यातील गावे ओस पडली आहेत. वीटभट्टीसाठी स्थलांतरित झालेली सर्वच आदिवासी कुटुंबे आर्थिकदृष्टय़ा दुर्बल आहेत. पावसाळ्यात रानभाज्या विकून आणि शेतात मजुरीवर काबाडकष्ट करून कुटुंबाचे संगोपन करतात. त्यानंतर मात्र रोजगार नसल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी गाव सोडावे लागते. शहरात मिळेल ते काम करून त्यांना रोजगार मिळवावा लागतो. आदिवासी समाजासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत, मात्र त्या त्यांच्या पर्यंत पोहोचलेल्या नाहीत. शासनाची घरकुल योजना असतानाही या समाजाला कुडाच्या भिंती असलेल्या घरांमध्ये राहावे लागते. शिक्षणाच्या प्रवाहापासूनही दूर असल्याने त्यांना कायमचा रोजगार मिळत नाही.

भूमिहीन, अल्पभूधारक आदिवासी शेतमजुरांना पावसाळ्यात चार महिने शेतीची कामे असतात. मात्र या भागात रोजगार, उद्योग नसल्याने वर्षांतले आठ महिने रोजगारासाठी वणवण भटकावे लागले. अनेक जण वीटभट्टीच्या उद्योगांकडे धाव घेतात. भर उन्हात भट्टीच्या उष्णतेत काम करून त्यांच्या आरोग्यावर परिणाम झालेला आहे. जर गावातच रोजगार मिळता तर स्थलांतर थांबू शकेल, असे सोनाळे येथील जानू चौरे या आदिवासी रहिवाशाने सांगितले.

या गावांतील आदिवासींचे स्थलांतर

जामशेत, कैनाड, सायवन, रायपूर, बापूगाव, दिवशी, दाभाडी, चळणी, सुकट आंबा, दादडे, मोडगाव, हळदपाडा, आंबेसरी, बहारे, धरमपूर, विवळवेढे चरी, बांधघर, निंबापूर, धरमपूर, रायपूर, धानिवरी, कोदाड, चिंचले, आंबोली, शीसने, कारंज्विरा,ओसरविरा, कांदरवाडी, थेरोंडा, वेती, मुरबाड, घोळ, सोनाळे, खानीव, महालक्ष्मी, सारणी, पेठ, मोडगाव, धुंदलवाडी

स्थलांतर रोखण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जातात. त्यांना जॉबकार्ड देण्यात आली आहेत. मागणीनुसार रस्ते, विहिरी, घरकुलाची कामे दिली जातात. मात्र समाजाची मानसिकता रोख कमाईकडे असल्याने वीटभट्टी आणि शहरी भागातील इतर कामांकडे त्यांचा ओढा अधिक आहे.

– बी. एच. भरक्षे, गटविकास अधिकारी, डहाणू पंचायत समिती

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2019 2:45 am

Web Title: dahanu tribal migration for employment
Next Stories
1 भाजप म्हणते आमची, सेनाही म्हणते आमची
2 शरद पवारांची उमेदवारी आणि नेत्यांना सूचक इशारा
3 कमळ पुन्हा फुलणार की काँग्रेस बालेकिल्ला पुन्हा जिंकणार?
Just Now!
X