23 February 2019

News Flash

बोडखीमधील बांध फुटल्याने ५० एकरांतील पीक भुईसपाट

हिंगोली तालुक्यातील बोडखी येथील गट क्रमांक १७५मधील कृषी विभागाने बांधलेला मातीनाला बांध मुसळधार पावसामुळे फुटल्याने सुमारे ५० एकर शेतातील पीक भुईसपाट झाले.

| June 19, 2015 01:30 am

हिंगोली तालुक्यातील बोडखी येथील गट क्रमांक १७५मधील कृषी विभागाने बांधलेला मातीनाला बांध मुसळधार पावसामुळे फुटल्याने सुमारे ५० एकर शेतातील पीक भुईसपाट झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्ह्याधिकारी, कृषी विभाग यांना निवेदन देऊन भरपाईची मागणी केली.
कृषी विभागातर्फे बोडखी शिवारात पाच-सहा वर्षांपूर्वी गट क्रमांक १७५/१मध्ये मातीनाला बांधकाम करण्यात आले. १६ व १७ जूनच्या रात्री बोडखी परिसरात जोरदार पाऊस झाला. गट क्रमांक १७५/१, १७५/२, १७१मध्ये एकूण ९० एकर जमीन आहे. पकी ५० एकर जमिनीवर शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. मात्र, मातीनाला बांध फुटून पाणी वाहिल्यामुळे शेतातील सोयाबीनचे संपूर्ण पीक मातीसह वाहून गेले. प्रल्हाद नारायण िशदे, गणपत िशदे, तुकाराम िशदे, अप्पाजी िशदे, नामदेव िशदे, गजानन िशदे, गणेश विक्रम िशदे यांच्या शेतीचे नुकसान झाले. मागील दोन वर्षांपासून नसíगक संकटात सापडलेल्या या शेतकऱ्यांनी यंदा बी-बियाण्यांची जुळवाजुळव करून पेरणी केली होती. परंतु मुसळधार पावसामुळे मातीसह पीक वाहून गेल्याने शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा चुराडा झाला. दोन लाखांवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी, तसेच जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयास भेट देऊन नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित नुकसानीचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश कृषी विभागास दिल्याचे सांगितले.

First Published on June 19, 2015 1:30 am

Web Title: dam burst in bodkhi 50 acre harvest damage