विरार पश्चिमेतील बोळींज येथील जापके आळी परिसरात एका घरावर बुधवारी रात्री वीज पडून मालमत्ता व विद्युत उपकरणांचे नुकसान झाले असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुसळधार पाऊस व विजेचा मारा यामुळे अचानकपणे वीज हि राहत्या घरातील कौलाला छेदून थेट घरात कोसळली आहे.

बुधवारी रात्रीच्या सुमारास वसईच्या विविध भागात मुसळधार पावसासह विजेचा जोरदार कडकडाट सुरु होता. तर वसईच्या बहुतांश सखल भागात पाणी साचले होते. मात्र त्याची बरोबर विजेचा तडाखे प्रचंड असल्याने त्याचा फटका बोळींज येथे राहणाऱ्या जॉन सालोमन लोपीस यांचा कुटुंबियांना बसला आहे.

In Vidarbha thousands of hectares of orchards and crops were destroyed due to unseasonal rains
विदर्भात हजारो हेक्टरवरील फळबागा, पिकांची नासाडी; तिसऱ्या दिवशीही अवकाळीचे तांडव
Pimpri, Leakage in water channel, moshi,
पिंपरी : मोशीत जलवाहिनीला गळती, हजारो लीटर पाणी वाया
crow trapped in Dombivli
डोंबिवलीत पतंगीच्या मांजात अडकलेल्या कावळ्याची अग्निशमन जवानांकडून सुखरूप सुटका
mukhtar ansari death gangster turned politician buried near his parents graves in ghazipur
मुख्तार अन्सारीच्या मृतदेहाचे दफन

घरातील कौलाला छेडून घराच्या आतील बाजूचे सिलिंग तोडून वीज घरात पडली असल्याने लोपीस यांनी सांगितले आहे. यामुळे मोठय़ा प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये कौले तुटली असून सिलिंग सुद्धा खराब झाली आहे तसेच घरात असलेले  ६ पंखे, व इन्व्हाईटर व इतर विद्यूत उपकरणे जळाली असल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे असे त्यांनी सांगितले आहे. या घटनेमध्ये या सुदैवाने कोणतीच जीवितहानी झाली नाही.  या घडलेल्या घटनेची माहिती तलाठी कार्यालयाला दिली असून सदर घटनेचा पंचनामा करून योग्य ती नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.