10 July 2020

News Flash

दामू गायकवाड  यांच्या अवयवदानाने ५ रुग्णांना जीवनदान

कर्जत तालुक्यातील बारडगाव सुद्रिक येथील रहिवासी दामू पंढरीनाथ गायकवाड यांचे आकस्मिक निधन झाले.

नगर : कर्जत तालुक्यातील बारडगाव सुद्रिक येथील रहिवासी दामू पंढरीनाथ गायकवाड यांचे आकस्मिक निधन झाले. ते ५२ वर्षांचे होते. ते दौंड येथे बहिणीच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेले होते. त्यानंतर परतताना चक्कर येऊन कोसळले. या घटनेनंतर त्यांना पुणे येथील रु बी हॉल रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र, मेंदू मृतावस्थेत गेल्याने आठ दिवसांच्या अथक प्रयत्नानंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ शकली नाही. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या इच्छेनुसार रुबी हॉल रुग्णालयातच त्यांचे अवयवदान करण्यात आले. त्यांचे हृदय, डोळे, किडनी, फुफ्फुस चांगले असल्याने ते इतर रु ग्णांना बसवण्यात आल्याने त्यांच्या जीवनात प्रकाश आला. दामू गायकवाड यांचे हृदय दिल्ली येथील फोर्टीस रुग्णालयातील रुग्ण महिलेस देण्यात आले. फुफ्फुस व यकृताचे मुंबईतील ग्लोबल रुग्णालयातील रुग्णास, तसेच एक किडनी रु बी हॉल रुग्णालयातील रुग्णास व दुसऱ्या किडनीचे ससून रुग्णालयात प्रत्यारोपण करण्यात आले. दामू गायकवाड यांची अवयवदानाची इच्छा होती. ती प्रक्रिया त्यांचे बंधू बंडू गायकवाड व भाचे गौतम आढाव यांनी पार पाडण्यासाठी तातडीने हालचाल केल्यामुळे ५ रुग्णांना जीवनदान मिळाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2020 2:21 am

Web Title: damu gaikwad donated organ five patient life giving akp 94
Next Stories
1 वैद्यकीय विद्यार्थ्यांत समाजभान निर्माण करणारी ‘सेवांकुर’
2 रायगडमधील सहकारी बँकांना घोटाळ्यांचे ग्रहण!
3 ‘बविआ’च्या जव्हार तालुकाध्यक्षाला अटक
Just Now!
X