News Flash

दापोलीतील घरकुल योजनेत फसवणूक

या प्रकरणामुळे जिह्यातील घरकुल योजनेची कार्यवाही नव्याने संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यतील घरकुलांची कार्यवाही पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत दापोली तालुक्यात दोन घरकुल अपूर्ण असूनही लाभार्थ्यांना पूर्ण अनुदान अदा करण्याचा खळबळजनक प्रकार आता उघडकीस आला आहे. पंचायत समितीने याची गांभीर्याने दखल घेत तातडीने चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाय़यांना दिले आहेत. या प्रकरणामुळे जिह्यातील घरकुल योजनेची कार्यवाही नव्याने संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

दापोली तालुक्यात मागील आíथक वर्षांत पंतप्रधान आवास योजनेसह इंदिरा आवास योजना, शबरी आवास योजना आणि रमाई आवास योजनेंतर्गत २५० लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये ११८ लाभार्थ्यांना पहिला, तर १०५ लाभार्थ्यांना अनुदानाच्या दुसय़या हफ्त्याचे वितरण करण्यात आले आहे. यातही अनेकांची घरकुले पूर्ण होऊनही त्यांना अनुदानाचा तिसरा हफ्ता अजूनही मिळालेला नाही. पण पंतप्रधान आवास योजनेतील ओणनवसे येथील दोन घरकुलांची कामे अपूर्ण असतानाच त्यांना तिन्ही हफ्ते अदा करण्यात आल्याची खळबळजनक माहिती आता पुढे आली आहे. याअतंर्गत लाभार्थ्यांला तीन हफ्त्यात ९५ हजार रूपये दिले जातात.  त्यामुळे दापोली तालुक्यातील या योजनेच्या कार्यवाहीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

विशेष म्हणजे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दिलीप रूके यांनी गेल्या आíथक वर्षांत झालेल्या या फसवणूक प्रकरणावर शिक्कामोर्तब केले असून याबाबत चौकशी अहवाल तयार करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. संबंधित दोन्ही घरकुलांचा पाया आणि थोड्याशा िभतींचे बांधकामच फक्त पूर्ण असल्याचा पाहणी अहवालही त्यांनी वरिष्ठांना दिला आहे. मात्र ही फसवणूक नेमकी कोणामुळे झाली आहे, यावर पुढे कोणती कार्यवाही करायची, याबाबत अहवाल तयार करण्याचे काम सुरू असल्याचे संबंधित अधिकाय़ऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, जिल्ह्याभरात घरकुल योजनेतील भ्रष्टाचाराची प्रकरणं गाजत असताना त्यात दापोलीतील घरकुल योजनेतील फसवणूक प्रकरणांचाही आता समावेश झाला आहे. ही दोन्ही प्रकरणं फारशी गंभीर नसून संबंधितांकडून सदर रकमेची वसुली करण्यात येईल. त्यामुळे याबाबत अद्याप तरी कोणतीही कायदेशीर कारवाईचा विचार पंचायत समितीकडून झालेला नसल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. मात्र याप्रकरणी ओणनवसे गावातील ग्रामसेवकाची कार्यपद्धत संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2017 2:57 am

Web Title: dapoli gharkul yojana pradhan mantri awas yojana
Next Stories
1 बेंदराच्या सणाकडे बळीराजाची पाठ
2 बेंदूरनिमित्त बैलांपुढे लावण्यांचा फड!
3 पंढरपुरमध्ये महास्वच्छता अभियानात ६० टन कचरा गोळा
Just Now!
X